Jump to content

क्षत्रिय


क्षत्रिय हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार चातुर्वर्ण्यातील एक वर्ण आहे. या वर्णातील व्यक्ती योद्धा (लढाऊ व्यक्ती) असतात. आजही क्षत्रिय समाजाचे लोक भारतभर विखुरलेले आहे. राजपूतांनी क्षत्रियांचा गौरवशाली इतिहास रचला. महाराष्ट्राचा विचार केल्यास मराठा समाज क्षत्रिय आहे क्षत्रिय मराठ्यांमध्ये 96 क्षत्रिय कुळ आहेत त्यालाच 96 कुळी मराठा असे म्हणले जाते, ९७ कुळी गोर बंजारा व १०८ कुळी क्षत्रिय धनगर हे देखील महाराष्ट्रात क्षत्रिय आहेत. महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज हे सुर्यवंशातील क्षत्रिय मराठा होते.


तर भारतातील इतर क्षत्रियांमध्ये, जाट, धनगर, रामोशी ,अहिर, गुर्जर, पाटीदार, गोर , राजपूत बंजारा हे वैदिक क्षत्रिय म्हणून ओळखले जातात. क्षत्रियामध्ये विशेषत्वाने राठोड (जोधपूर प्रांत) , पवार (माळवा प्रांत) आणि चव्हाण (चक्रीगड) घराण्यांचा उल्लेख केला जातो. क्षत्रियांचा सुवर्ण इतिहास खऱ्याअर्थाने राजपुतानाच्या इतिहासात आढळून येतो. इतिहासकार आचार्य गौरीशंकर ओझा आणि बळीराम हिरामण पाटील यांनी आपल्या ग्रंथात क्षत्रियाच्या वंशावळी , कुळाविषयी मांडणी केल्याचे दिसून येते.

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मण • क्षत्रियवैश्यशूद्र