क्वेबेक सिटी
क्वेबेक सिटी Quebec City | |||
कॅनडामधील शहर | |||
| |||
क्वेबेक सिटी | |||
देश | कॅनडा | ||
प्रांत | क्वेबेक | ||
स्थापना वर्ष | ३ जुलै १६०८ | ||
क्षेत्रफळ | ४५४.३ चौ. किमी (१७५.४ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,९१,१४२ | ||
- घनता | १,०८१.२ /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
http://www.ville.quebec.qc.ca |
क्युबेक ही कॅनडा देशातील क्वेबेक ह्या प्रांताची राजधानी आहे. मॉंत्रियाल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे. पर्यायी मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.
अल्गॉन्किन भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शहरांच्या दरम्यान सेंट लॉरेन्स ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीच्या भिंती अजूनही शाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.
क्युबेक शहर तिथल्या उन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिद्ध आहे. "कार्निव्हल" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. "शातो फ्रोंतनाक" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, "म्युझे दला सिव्हिलिझास्यॉं", "म्युझे दे बोझार" ही इथली प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, "मॉन्टमोरेन्सी" नावाचा धबधबा आणि "सेन्ट ऍन द बोप्रे" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.
येथे फ्रेंच भाषकांचे बहुमत असून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे.