Jump to content

क्वीन्सलंड

क्वीन्सलंड
Queensland
ऑस्ट्रेलियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

क्वीन्सलंडचे ऑस्ट्रेलिया देशाच्या नकाशातील स्थान
क्वीन्सलंडचे ऑस्ट्रेलिया देशामधील स्थान
देशऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानीब्रिस्बेन
क्षेत्रफळ१८,५२,६४२ चौ. किमी (७,१५,३०९ चौ. मैल)
लोकसंख्या५०,२७,८८९
घनता२.९ /चौ. किमी (७.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२AU-QLD
प्रमाणवेळयूटीसी+१०:००
संकेतस्थळqld.gov.au

क्वीन्सलंड हे ऑस्ट्रेलिया देशातील एक राज्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागातील क्वीन्सलंडच्या पश्चिमेस नॉर्दर्न टेरिटोरी, आग्नेयेस साउथ ऑस्ट्रेलिया, दक्षिणेस न्यू साउथ वेल्स ही राज्ये तर पूर्वेस प्रशांत महासागराचा कॉरल समुद्र आहेत. उत्तरेस टोरेस सामुद्रधुनी क्वीन्सलंडच्या केप यॉर्क द्वीपकल्पाला न्यू गिनी ह्या बेटापासून अलग करते. क्वीन्सलंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील दुसरे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसरे सर्वांत मोठे राज्य आहे. ब्रिस्बेन ही क्वीन्सलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. गोल्ड कोस्ट हे देखील क्वीन्सलंडमधील एक मोठे शहर आहे.

१८व्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्वीन्सलंडचे नाव व्हिक्टोरिया राणीवरून देण्यात आले आहे. १ जानेवारी १९०१ रोजी क्वीन्सलंडला राज्याचा दर्जा मिळाला.

गॅलरी

बाह्य दुवे