क्रिस्तोफर प्लमर
क्रिस्तोफर प्लमर | |
---|---|
जन्म | आर्थर क्रिस्तोफर ऑर्मी प्लमर १३ डिसेंबर १९२९ टोरांटो, ओन्टारिओ, कॅनडा |
मृत्यू | ५ फेब्रुवारी २०२१ यू. एस. ए. |
राष्ट्रीयत्व | कॅनडीयन |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
भाषा | इंग्लिश |
पुरस्कार | अकादमी पुरस्कार |
आर्थर क्रिस्तोफर ऑर्मी प्लमर सीसी (१३ डिसेंबर १९२९ - ५ फेब्रुवारी २०२१) हे एक कॅनडीयन अभिनेते होते. त्यांनी अभिनेता म्हणून नाटकांमध्ये, टीव्हीवरील मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सात दशके काम केले. त्यांनी १९५४ साली, ब्रोड्वेमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर नाटकांमधील मुख्य पत्राच्या भूमिकांसाठी काम केले. १९७४ सालातील सिरानो ह्या नाटकामध्ये त्यांनी सिरानो दे बेर्जेराक ह्याची भूमिका केली आणि ओथेलो नावाच्या नाटकामध्ये इयागोची भूमिका त्यांनी केली.[१] त्यांची नाटकामधील महत्त्वाची कामे आहेत- हॅमलेट इन एलसीनॉर(१९६४), मॅकबेथ, किंग लियर आणि बॅरीमोर.
प्लमर ह्यांनी १९५८ साली, स्टेज स्ट्रक ह्या चित्रपटातून चित्रपट अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांनी विंड अॅक्रॉस एव्हरग्लेड्समध्ये काम केले. त्यांच्या द साउंड ऑफ म्युझिक(१९६५) मधील कॅप्टन जॉर्ज व्हॉन ह्या भूमिकेसाठी त्यांचे खूप कौतुक झाले. प्लमर ह्यांनी त्यानंतर द फॉल ऑफ द रोमन एम्पायर(१९६४), फर्स्ट ड्यूक ऑफ वेलिंग्टन इन वॉटर्लू (१९७०), द मॅन हू वूड बी किंग(१९७५), द इंसायडर(१९९९), द लास्ट स्टेशन(२००९), इनसाईड मॅन(२००६), द एक्सेप्शन(२०१६) आणि अॉल द मनी इन द वर्ल्ड(२०१७) ह्या चित्रपटांमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारल्या. त्यांनी माल्कम एक्स(१९९२), अ ब्युटीफुल माईन्ड(२००१), द न्यू वर्ल्ड(२००५), द गर्ल विथ अ ड्रेगन टॅटू(२०११), नाईव्स आउट(२०१९) ह्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.[२]
प्लमर ह्यांना एक अकादमी पुरस्कार[३], दोन प्राईमटाईम एमी पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार[४], एक स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी पुरस्कार[५] मिळाला आहे. त्यांना २०१० साली, बिगिनर्स ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी, वयाच्या ब्याय्शीव्यावर्षी सर्वोत्कृष्ट साहाय्य अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. २०२१ साली अॅन्थनी हॉपकिन्स ह्यांना हा पुरस्कार वयाच्या त्र्याऐशी मिळण्या आधी प्लमर हे अकादमी पुरस्कार मिळवणारे सर्वात मोठे कलाकार होते.[६] अठ्ठ्याशीव्या वर्षी अॉल द मनी इन द वर्ल्ड ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ह्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Christopher Plummer". www.goldenglobes.com. 2021-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Christopher Plummer". IMDb. 2021-06-07 रोजी पाहिले.
- ^ "The Oscar Elders: 3 Octogenarians Make Academy Award History". NPR.org (इंग्रजी भाषेत). 2021-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Christopher Plummer". www.goldenglobes.com. 2021-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Film in 2012 | BAFTA Awards". awards.bafta.org. 2021-06-07 रोजी पाहिले.
- ^ Martinelli, Marissa (2021-04-26). "The Other Way Anthony Hopkins' Win Was Historic: He's Openly Autistic". Slate Magazine (इंग्रजी भाषेत). 2021-06-07 रोजी पाहिले.