Jump to content

क्रिस्चियन दुसरा

क्रिस्चियन दुसरा (१ जुलै, १४८१ - २५ जानेवारी, १५५९) हा सोळाव्या शतकातील डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडनचा राजा होता. हा १५१३ ते १५२३ पर्यंत डेन्मार्क आणि नॉर्वे तर १५२०-२१ दरम्यान स्वीडनच्या राजगादीवर होता. याला त्याच्या काका फ्रेडरिक पहिल्याने पदच्युत केला व त्यास नेदरलॅंड्समध्ये तडीपार केले.