Jump to content

क्रिशन भील

क्रिशन भील (मार्च १, इ.स. १९६८ - ) हा पाकिस्तानमधील हिंदू राजकारणी आहे.[]

सुरुवातीचे जीवन

भीलचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद शहरात झाला. त्याने इ.स. १९९०मध्ये सिंध विद्यापीठातून पदवी मिळवली

थोबाडीत मारल्याची घटना

भीलने पाकिस्तानच्या संसदेत (मजलिस) दुसऱ्या एका सदस्याच्या थोबाडीत मारल्यावरून त्याची ख्याती जास्त पसरली आहे. संसदेतील चर्चे दरम्यान भीलच्या पक्षातील एका सदस्याने राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफची निंदा केली. त्यावरून विरोधी पक्षाच्या कारी गुल रेहमानने मुशर्रफची स्तुती करणारा कसीदा म्हणला. त्यानंतर भीलच्या पक्षातील सदस्यांनी रेहमानची खिल्ली उडवली. चर्चा संपल्यावर रेहमान भीलजवळ आला व त्याला (भीलला) हिंदू असल्यावरून जातीवाचक शिवी दिली. संतापाच्या भरात भीलने तीनवेळा रेहमानच्या श्रीमुखात भडकावल्या. त्यानंतर इतर सदस्यांनी मध्ये अंग घालून मारामारी थांबवली.[]

संदर्भ

  1. ^ [१] पाकिस्तान शासनातील सुधारणा व प्रामाणिकता वाढवणारी संस्था
  2. ^ द नेशनमधील बातमी, डिसेंबर ९, इ.स. २००५ द नेशन