Jump to content

क्रिकेटमधील गोलंदाजांचे प्रकार

क्रिकेटमधील गोलंदाजांचे मुख्य दोन प्रकार पडतात : वेगाचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज आणि चेंडूला विशिष्ट प्रकारे दिलेल्या फिरकीचा प्रामुख्याने वापर करणारे गोलंदाज. पहिल्या प्रकारातील गोलंदाजांना वेगवान गोलंदाज तर दुसऱ्या प्रकारातील गोलंदाजांना फिरकी गोलंदाज म्हणतात. फिरकी गोलंदाजांचे प्रमुख अस्त्र चेंडूला दिलेली फिरक हे असले तरी वेगात अधूनमधून बदल करूनही ते फलंदाजांना चकवू शकतात. फिरकी गोलंदाजांसाठी मंदगती गोलंदाज ही संज्ञाही काही वेळा वापरली जाते.

वेगवान गोलंदाज

वेगवान गोलंदाजांचे त्यांच्या गोलंदाजीच्या वेगानुसार दोन प्रकार पडतात.

  1. द्रुतगती गोलंदाज : यांचे चेंडूच्या शिवणीचा (सीम) वापर करणारे (शिवण्या गोलंदाज) आणि चेंडूला टप्प्या पडल्यानंतर विशिष्ट बाजूला झुकविणारे, डूल (स्विंग) देणारे (डुल्या गोलंदाज) असे दोन उपप्रकार पडतात.
  2. मध्यमगती गोलंदाज : यांच्या गोलंदाजीची गती द्रुतगती गोलंदाजांपेक्षा थोडी कमी असते.

वेगवान गोलंदाज प्रामुख्याने नव्या चेंडूचा प्रभावी वापर करू शकतात. कर्णधाराच्या डावपेचांनुसार मात्र नवा चेंडू भरवशाच्या फिरकी गोलंदाजालाही दिला जाऊ शकतो.

फिरकी गोलंदाजांचे अंगुली फिरके (बोटांनी चेंडूला फिरक देणारे) आणि मणिबंध फिरके (मनगटाने चेंडूला फिरक देणारे) असे दोन प्रमुख प्रकार पडतात.