क्रिकेट विश्वचषक, २०१९ - गट फेरी
गट फेरी ही राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, जेथे सर्व दहा संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील. याचा अर्थ एकूण ४५ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळेल. ग्रुपमधील पहिले चार संघ बाद फेरीत प्रगती करतील. ह्याप्रकारचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९२ मध्ये वापरले गेले होते, परंतु त्या स्पर्धेत दहाऐवजी नऊ टीम्स खेळल्या होत्या.
गुणफलक
विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)
विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:
- सर्वात जास्त गुण.
- जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
- जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
क्र | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | भारत | ९ | ७ | १ | ० | १ | १५ | +०.८०९ | ||
२ | ऑस्ट्रेलिया | ९ | ७ | २ | ० | ० | १४ | +०.८६८ | ||
३ | इंग्लंड | ९ | ६ | ३ | ० | ० | १२ | +१.१५२ | ||
४ | न्यूझीलंड | ९ | ५ | ३ | ० | १ | ११ | +०.१७५ | ||
५ | पाकिस्तान | ९ | ५ | ३ | ० | १ | ११ | -०.४३० | ||
६ | श्रीलंका | ९ | ३ | ४ | ० | २ | ८ | -०.९१९ | ||
७ | दक्षिण आफ्रिका | ९ | ३ | ५ | ० | १ | ७ | -०.०३० | ||
८ | बांगलादेश | ९ | ३ | ५ | ० | १ | ७ | -०.४१० | ||
९ | वेस्ट इंडीज | ९ | २ | ६ | ० | १ | ५ | -०.२२५ | ||
१० | अफगाणिस्तान | ९ | ० | ९ | ० | ० | ० | -१.३२२ | ||
४ जुलैच्या पर्यंतच्या सामन्यांपर्यंत अद्ययावत. संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो |
|
सामने
इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका
इंग्लंड ३११/८ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २०७ (३९.५ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- इंग्लंडकडून खेळताना आयॉन मॉर्गनचा २००वा एकदिवसीय सामना.[१] तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील ७००० धावा पूर्ण.[२]
- इम्रान ताहिर (द.आ.) विश्वचषकाचा पहिला चेंडू टाकणारा पहिला फिरकीपटू ठरला.
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
पाकिस्तान १०५ (२१.४ षटके) | वि | वेस्ट इंडीज १०८/३ (१३.४ षटके) |
क्रिस गेल ५० (३०) मोहम्मद आमीर ३/२६ (६ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज , क्षेत्ररक्षण
- हसन अलीचा (पा) ५०वा एकदिवसीय सामना.[३]
- शाई होपने (वे) यष्टीरक्षक म्हणून त्याचा १००वा आंतरराष्ट्रीय झेल घेतला.[४]
- ख्रिस गेलचा (वे) ४० वा षट्कार ठोकून ए.बी. डी व्हिलियर्सचा ३७ षट्कारांचा विश्वचषक सामन्यांतील विक्रम मोडला.[५]
- हा पाकिस्तानचा सलग ११ वा पराभव आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात खराब पराभवाची मालिका.[६]
- पाकिस्तानची विश्वचषक स्पर्धेतील दुसरी सर्वात लहान धावसंख्या आणि विश्वचषक स्पर्धेतील त्यांचा हा सर्वात जास्त चेंडूंच्या फरकाने झालेला पराभव (२१८ चेंडू).[७]
न्यू झीलंड वि श्रीलंका
श्रीलंका १३६ (२९.२ षटके) | वि | न्यूझीलंड १३७/० (१६.१ षटके) |
दिमुथ करुणारत्ने ५२ (८४) लॉकी फर्ग्युसन ३/२२ (६.२ षटके) | मार्टिन गप्टिल ७३ (५१) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
- जेम्स नीशॅमचा (न्यू) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]
- क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये नाबाद राहणारा दिमुथ करुणारत्ने (श्री) हा दुसराच सलामीवीर.[९]
ऑस्ट्रेलिया वि अफगाणिस्तान
अफगाणिस्तान २०७ (३८.२ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया २०९/३ (३४.५ षटके) |
नजीबुल्लाह झाद्रान ५१ (४९) पॅट कमिन्स ३/४० (८.२ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका
बांगलादेश ३३०/६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ३०९/८ (५० षटके) |
मुशफिकुर रहीम ७८ (८०) ॲंडिल फेह्लुक्वायो २/५२ (१० षटके) | फाफ डु प्लेसिस ६२ (५३) मुस्तफिजुर रेहमान ३/६७ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- इम्रान ताहिरचा (द.आ.) १०० वा एकदिवसीय सामना.[१०]
- शकिब अल हसन आणि मुशफिकुर रहिमची तिसऱ्या गड्यासाठी १४२ धावांची भागीदारी. ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशतर्फे सर्वात मोठी भागीदारी.[११]
- बांगलादेशची सर्वोत्कृष्ट एकदिवसीय धावसंख्या.[१२]
- शकिब अल हसन (बा) हा सर्वात कमी सामन्यांमध्ये (१९९) २५० बळी आणि ५००० धावा करणारा क्रिकेट खेळाडू ठरला.[१३]
इंग्लंड वि पाकिस्तान
पाकिस्तान ३४८/८ (५० षटके) | वि | इंग्लंड ३३४/९ (५० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- सरफराज अहमदचे (पा) १०० एकदिवसीय झेल पूर्ण.
- जेसन रॉयच्या (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण.[१४]
अफगाणिस्तान वि श्रीलंका
श्रीलंका २०१ (३६.५ षटके) | वि | अफगाणिस्तान १५२ (३२.४ षटके) |
कुशल परेरा ७८ (८१) मोहम्मद नबी ४/३० (९ षटके) | नजीबुल्लाह झाद्रान ४३ (५६) नुवान प्रदीप ४/३१ (९ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण
- श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला आणि अफगाणिस्तान समोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- रशीद खानचा अफगाणिस्तानकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[१५]
- लहिरु थिरिमन्नेच्या (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण.[१६]
भारत वि दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका २२७/९ (५० षटके) | वि | भारत २३०/४ (४७.३ षटके) |
ख्रिस मॉरिस ४२ (३४) युझवेंद्र चहल ४/५१ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- जसप्रीत बुमराहचा (भा) ५० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१७]
- रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण.[१८]
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा भारतीय कर्णधार म्हणून ५०वा विजय.[१९]
बांगलादेश वि न्यू झीलंड
बांगलादेश २४४ (४९.२ षटके) | वि | न्यूझीलंड २४८/८ (४७.१ षटके) |
शकीब अल हसन ६४ (६८) मॅट हेन्री ४/३७ (९.२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
- शकीब अल हसनचा (बां) २०० वा एकदिवसीय सामना.[२०]
- मुशफिकुर रहिमचा बांगलादेशकडून ३५०वा आंतरराष्ट्रीय सामना.[२१]
- रॉस टेलरचा न्यू झीलंडकडून ४००वा आंतरराष्ट्रीय सामना.[२२]
- लॉकी फर्ग्युसनने (न्यू) एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०वा गडी बाद केला.[२३]
- ट्रेंट बोल्टने (न्यू) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1५०वा गडी बाद केला.[२४]
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया २८८ (४९ षटके) | वि | वेस्ट इंडीज २७३/९ (५० षटके) |
नेथन कल्टर-नाईल ९२ (६०) कार्लोस ब्रेथवेट ३/६७ (१० षटके) | शाई होप ६८ (१०५) मिचेल स्टार्क ५/४६ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- वेस्ट इंडीज संघाचा हा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[२५]
- पॅट कमिन्सचा (ऑ) ५०वा एकदिवसीय सामना.[२६]
- ख्रिस गेलच्या (वे) विश्वचषक स्पर्धेत १००० धावा पूर्ण.[२७]
- मिचेल स्टार्क (ऑ) हा सर्वात कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये (७७) १५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.[२८]
- आंद्रे रसेल (वे) हा सर्वात कमी चेंडूंमध्ये १००० एकदिवसीय धावा करणारा खेळाडू ठरला (७६७).[२९]
पाकिस्तान वि श्रीलंका
इंग्लंड वि बांगलादेश
इंग्लंड ३८६/६ (५० षटके) | वि | बांगलादेश २८० (४८.५ षटके) |
शकिब अल हसन १२१ (११९) बेन स्टोक्स ३/२३ (६ षटके) |
अफगाणिस्तान वि न्यू झीलंड
अफगाणिस्तान १७२ (४१.१ षटके) | वि | न्यूझीलंड १७३/३ (३२.१ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
- जेम्स नीशॅमचे (न्यू) एका सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी आणि ५० एकदिवसीय बळू पूर्ण.[३२]
ऑस्ट्रेलिया वि भारत
भारत ३५२/५ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ३१६ (५० षटके) |
स्टीव्ह स्मिथ ६९ (७०) भुवनेश्वर कुमार ३/५० (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- रोहित शर्माचा (भा) एकाच संघाविरुद्ध सर्वात कमी डावांत २,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम (३७ डाव).[३३]
- १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लीड्स येथे झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मिळवलेल्या सलग १९ विजयांची त्यांची शृंखला खंडीत झाली. .[३४][३५]
- ॲलेक्स कॅरीचे ऑस्ट्रेलियातर्फे विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक[३५]
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने विश्वचषक स्पर्धेत केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.[३६]
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज
दक्षिण आफ्रिका २९/२ (७.३ षटके) | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण
- दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द
बांगलादेश वि श्रीलंका
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया ३०७ (४९ षटके) | वि | पाकिस्तान २६६ (४५.४ षटके) |
डेव्हिड वॉर्नर १०७ (१११) मोहम्मद आमीर ५/३० (१० षटके) |
भारत वि न्यू झीलंड
भारत | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द
इंग्लंड वि वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज २१२ (४४.४ षटके) | वि | इंग्लंड २१३/२ (३३.१ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण
- आयॉन मॉर्गनचा इंग्लंडकडून ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना.[३९]
- मार्क वूडने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीत ५०वा गडी बाद केला.[४०]
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
ऑस्ट्रेलिया ३३४/७ (५० षटके) | वि | श्रीलंका २४७ (४५.५ षटके) |
आरोन फिंच १५३ (१३२) धनंजय डी सिल्वा २/४० (८ षटके) | दिमुथ करुणारत्ने ९७ (१०८) मिचेल स्टार्क ४/५५ (१० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण
अफगाणिस्तान वि दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान १२५ (३४.१ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १३१/१ (२८.१ षटके) |
रशीद खान ३५ (२५) इम्रान ताहीर ४/२९ (७ षटके) | क्विंटन डी कॉक ६८ (७२) गुलबदिन नायब १/२९ (६ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर ४८ षटकांमध्ये १२७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
भारत वि पाकिस्तान
भारत ३३६/५ (५० षटके) | वि | पाकिस्तान २१२/६ (४० षटके) |
रोहित शर्मा १४० (११३) मोहम्मद आमीर ३/४७ (१० षटके) | फखार झमान ६२ (७५) विजय शंकर २/२२ (५.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- पाकिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर डकवर्थ-लुईस नियमानुसार ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- विराट कोहलीच्या (भा) सर्वात कमी डावांमध्ये ११,००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण (२२२).[४१]
बांगलादेश वि वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज ३२१/८ (५० षटके) | वि | बांगलादेश ३२२/३ (४१.३ षटके) |
शाई होप ९६ (१२१) मुस्तफिझुर रहमान ३/५९ (९ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण
- मुस्तफिजुर रेहमानचा (बां) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४२]
- जेसन होल्डरचा (वे इं) १०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[४३]
- शाई होपचा वेस्ट इंडीजकडून १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[४४]
- शिमरॉन हेटमायरच्या (वे) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतील १,००० धावा पूर्ण.[४५]
- शकिब अल हसन ६००० धावा पूर्ण करणारा दुसरा बांगलादेश फलंदाज ठरला आणि सर्वात कमी डावांत ६००० धावा आणि २५० गडी बाद करणारा अष्टपैलू खेळाडू ठरला (२०२ डाव).[४६]
- बांगलादेशचा धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग तर विश्वचषक क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग.[४७]
इंग्लंड वि अफगाणिस्तान
इंग्लंड ३९७/६ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान २४७/८ (५० षटके) |
आयॉन मॉर्गन १४८ (७१) गुलबदिन नायब ३/६८ (१० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- आयॉन मॉर्गनचे इंग्लंडकडून विश्वचषक स्पर्धेतील सर्वात जलद शतक (५७ चेंडू),[४८] आणि त्याचा एकदिवसीय सामन्यातील एकाच डावात सर्वाधिक षट्कारांचा विक्रम (१७).[४९]
- इंग्लंडचा एकदिवसीय सामन्यात एका डावातील सर्वाधिक षट्कांरांचा सांघिक विक्रम (२५),[५०] आणि त्यांच्या क्रिकेट विश्वचषक सामन्यातील सर्वात मोठ्या धावसंख्येची नोंद.[५१]
- रशीद खानची (अ) क्रिकेट विश्वचषक सामन्यातील सर्वात महागडी गोलंदाजी, ९ षटकांमध्ये ११० धावांह एकदिवसीय इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज.[५२]
न्यू झीलंड वि दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका २४१/६ (४९ षटके) | वि | न्यूझीलंड २४५/६ (४८.३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण
- ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४९ षटकांचा खेळवण्यात आला.
- हाशिम आमला (द आ) हा कारकीर्दीतील ८,००० धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१७६).[५३]
- डेव्हिड मिलरच्या (द आ) ३००० एकदिवसीय धावा पूर्ण.[५४]
- केन विल्यमसनच्या न्यू झीलंडचा कर्णधार म्हणून ३००० धावा पूर्ण.[५५]
ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश
ऑस्ट्रेलिया ३८१/५ (५० षटके) | वि | बांगलादेश ३३३/८ (५० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- डेव्हिड वॉर्नर (ऑ) हा विश्वचषक सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाज.[५६]
- ऑस्ट्रेलियाची बांगलादेशविरुद्ध ही एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या.[५७]
- बांगलादेशची एकदिवसीय सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या.[५८]
- ह्या सामन्यात ७१४ धावा केल्या गेल्या, ज्या विश्वचषक सामन्यातील सर्वात जास्त धावा आहेत.[५७]
इंग्लंड वि श्रीलंका
श्रीलंका २३२/९ (५० षटके) | वि | इंग्लंड २१२ (४७ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- मोईन अलीचा (इं) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[५९]
- अदिल रशीद (इं) आणि ज्यो रूट (इं) या दोघांचा इंग्लंडकडून अनुक्रमे १५०वा आणि २५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[६०]
- ॲंजेलो मॅथ्यूजच्या (श्री) श्रीलंकेतर्फे खेळताना १२,००० आंतरराष्ट्रीय धावा.[६१]
- आयॉन मॉर्गनच्या (इं) इंग्लंडतर्फे खेळताना ९,००० आंतरराष्ट्रीय धावा.[६१]
- लसिथ मलिंगाचा (श्री) विश्वचषक स्पर्धेतील ५०वा बळी,[६२] आणि त्याचा विश्वचषक स्पर्धेत सर्वात कमी सामन्यात ५० गडी बाद करण्याचा विक्रम.[६३]
अफगाणिस्तान वि भारत
भारत २२४/८ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान २१३ (४९.५ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- मोहम्मद शमीने (भा) हॅट्रीक घेतली.[६४]
- भारताचा विश्वचषक स्पर्धेतील ५०वा विजय.[६५]
- या सामन्याच्या निकालामुळे अफगाणिस्तान स्पर्धेतून बाद.[६६]
न्यू झीलंड वि वेस्ट इंडीज
न्यूझीलंड २९१/८ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २८६ (४९ षटके) |
कार्लोस ब्रेथवेट १०१ (८२) ट्रेंट बोल्ट ४/३० (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- कार्लोस ब्रेथवेटचे (वे.इं.) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक.[६७]
पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान ३०९/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २५९/९ (५० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- ॲंडिल फेहलुक्वायोचा (द.आ.) ५०वा एकदिवसीय सामना.[६८]
- शदाब खानचे (पा) ५० एकदिवसीय बळी पूर्ण.[६९]
- या सामन्याच्या निकालामुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद. २००३ नंतर पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिकेला बाद फेरी गाठण्यात अपयश आले.[७०][७१]
अफगाणिस्तान वि बांगलादेश
बांगलादेश २६२/७ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान २०० (४७ षटके) |
मुशफिकूर रहिम ८३ (८७) मुजीब उर रहमान ३/३९ (१० षटके) | शमीउल्लाह शेनवारी ४९ (५१) शाकिब अल हसन ५/२९ (१० षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सौम्य सरकारचा (बां) ५०वा एकदिवसीय सामना.[७२]
- गुल्बदीन नाइबचा (अ) अफगाणिस्तानकडून खेळताना १००वा आंतरराष्ट्रीय सामना.[७३] तर त्याचे एकदिवसीय सामन्यात १,००० धावा पूर्ण.[७४]
- शाकिब अल हसन क्रिकेट विश्वचषकात १००० धावा[७५] आणि ५ बळी घेणारा बांगलादेशचा पहिला खेळाडू ठरला.[७६]
- युवराज सिंगनंतर एकाच सामन्यात ५०च्यावर धावा आणि ५ बळी घेणारा शाकिब अल हसन दुसरा गोलंदाज ठरला.[७७]
- विश्वचषक स्पर्धेत १००० धावा आणि ३० बळी घेणारा शकिब अल हसन हा एकमेव खेळाडू आहे. तसेच एकाच स्पर्धेत ४०० धावा आणि १० गडी बाद करणारासुद्धा तो एकमेव खेळाडू ठरला.[७८][७९]
इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया २८५/७ (५० षटके) | वि | इंग्लंड २२१ (४४.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- जेसन बेह्रेनड्रॉफचे (ऑ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाच बळी.[८०]
- या सामन्याच्या निकालामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत दाखल.[८१]
न्यू झीलंड वि पाकिस्तान
न्यूझीलंड २३७/६ (५० षटके) | वि | पाकिस्तान २४१/४ (४९.१ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- बाबर आझम (पाक) डावांचा विचार करता, एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ३००० धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला (६८).[८२]
- बाबर आझमचे (पाक) १०वे आणि विश्वचषकातले पहिले एकदिवसीय शतक.[८३]
भारत वि वेस्ट इंडीज
भारत २६८/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १४३ (३४.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- हार्दिक पंड्याचा (भा) ५०वा एकदिवसीय सामना.[८४]
- जेसन होल्डरचा वेस्ट इंडीजकरता १५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.[८५]
- विराट कोहली डावांचा विचारकरता, सर्वात जलद २०,००० आंतरराष्ट्रीय धावा काढणारा फलंदाज ठरला (४१७).[८६]
- या सामन्याच्या निकालामुळे वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद.[८७]
दक्षिण आफ्रिका वि श्रीलंका
श्रीलंका २०३ (४९.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २०६/१ (३७.२ षटके) |
अविष्का फर्नांडो ३० (२९) ड्वेन प्रिटोरियस ३/२५ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
अफगाणिस्तान वि पाकिस्तान
अफगाणिस्तान २२७/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान २३०/७ (४९.४ षटके) |
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- मोहम्मद नबीने (अ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००वा गडी बाद केला.[८८]
- शोएब मलिकचा (पाक) शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
ऑस्ट्रेलिया वि न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया २४३/८ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १५७ (४३.४ षटके) |
उस्मान ख्वाजा ८८ (१२९) ट्रेंट बोल्ट ४/५१ (१० षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- डेव्हिड वॉर्नरच्या (ऑ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १३,००० धावा पूर्ण.[८९]
- ट्रेंट बोल्टने या विश्वचषकातली २री हॅट्रीक घेतली[९०] तर विश्वचषकात हॅट्रीक घेणारा तो न्यू झीलंडचा पहिला गोलंदाज ठरला.[९१]
- केन विल्यमसन (न्यू) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत ६,००० धावा पूर्ण करणारा तिसरा सर्वात जलद फलंदाज ठरला (१३९).[९२]
- मिचेल स्टार्क (ऑ) हा विश्वचषक क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच गडी बाद करणारा पहिलाच गोलंदाज ठरला.[९३]
इंग्लंड वि भारत
इंग्लंड ३३७/७ (५० षटके) | वि | भारत ३०६/५ (५० षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- कुलदीप यादवचा (भा) ५० एकदिवसीय सामना.[९४]
- ह्या दोन संघांदरम्यान हा १०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[९५]
- मोहम्मद शमीचे (भा) एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[९६]
- युझवेंद्र चहलने (भा) भारतातर्फे विश्वचषकातल्या एका सामन्यात सर्वाधीक ८८ धावा दिल्या.[९७]
- विराट कोहली (भा) एका विश्वचषकात सलग ५ वेळा अर्धशतक ठोकणारा भारताचा पहिला तर जगातला दुसरा खेळाडू ठरला.
- या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.[९८]
श्रीलंका वि वेस्ट इंडीज
श्रीलंका ३३८/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज ३१५/९ (५० षटके) |
अविष्का फर्नांडो १०४ (१०३) जेसन होल्डर २/५९ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ख्रिस गेल हा वेस्ट इंडीज तर्फे सर्वाधिक ४५५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा खेळाडू ठरला.[९९]
- अविष्का फर्नांडोचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[१००]
- जेसन होल्डर हा वेस्ट इंडीज तर्फे १०० एकदिवसीय बळी घेणारा पहिलाच कर्णधार ठरला.[१०१]
- निकोलस पूरनचे (वे) पहिले एकदिवसीय शतक.[१०२]
बांगलादेश वि भारत
भारत ३१४/९ (५० षटके) | वि | बांगलादेश २८६ (४८ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- तमिम इक्बालचा (बां) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१०३]
- रोहित शर्माचा (भा) कुमार संघकाराच्या एका क्रिकेटविश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक ४ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी.[१०४]
- शकिब अल हसन (बां) हा एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा आणि १० गडी बाद करणारा पहिलाच क्रिकेट खेळाडू ठरला[१०५]
- या सामन्याच्या निकालामुळे भारत उपांत्यफेरीत दाखल तर बांगलादेश स्पर्धेतून बाद.[१०६]
इंग्लंड वि न्यू झीलंड
इंग्लंड ३०५/८ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १८६ (४५ षटके) |
जॉन लॅथम ५७ (६५) मार्क वूड ३/३४ (९ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- मॅट हेन्रीचा (न्यू) ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[१०७]
- ह्या सामन्याच्या निकालामुळे १९९२ नंतर इंग्लंड पहिल्यांदाच उपांत्य फेरीसाठी पात्र.[१०८]
- १९८३ विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच इंग्लंडने न्यू झीलंडला विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले[१०९][११०]
अफगाणिस्तान वि वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज ३११/६ (५० षटके) | वि | अफगाणिस्तान २८८ (५० षटके) |
शई होप ७७ (९२) दवलत झद्रान २/७३ (९ षटके) | इक्राम अली खील ८६ (९३) कार्लोस ब्रेथवेट ४/६३ (९ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- ख्रिस गेल (वे.इं) क्रिकेट विश्वचषकात वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक ३५ सामने खेळणारा खेळाडू ठरला.[१११] तर त्याने वेस्ट इंडीजकडून खेळताना २९५ एकदिवसीय सामने खेळण्याच्या ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली.[११२]
- ख्रिस गेल (वे.इं) त्याच्या शेवटच्या क्रिकेट विश्वचषक सामन्यात खेळला.
बांगलादेश वि पाकिस्तान
पाकिस्तान ३१५/९ (५० षटके) | वि | बांगलादेश २२१ (४४.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- मुस्तफिझुर रहमान (बां) डावांच्या बाबतीत विचारकरता एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेणारा बांगलादेशचा जलद गोलंदाज ठरला (५४).
- एका विश्वचषकामध्ये पाकिस्तानतर्फे बाबर आझमने सर्वाधीक धावा केल्या (४७४).
- बांगलादेशच्या शाकिब अल हसनने एका विश्वचषकात ७पेक्षा जास्त अर्धशतक करण्याच्या सचिन तेंडूलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- शहीन अफ्रिदी (पाक) विश्वचषक सामन्यात पाच बळी घेणारा सर्वात लहान गोलंदाज ठरला (१९ वर्षे, ९० दिवस). तर त्याने पाकिस्तानतर्फे विश्वचषकातली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
- या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्यफेरीत दाखल तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद.
भारत वि श्रीलंका
श्रीलंका २६४/७ (५० षटके) | वि | भारत २६५/३ (४३.३ षटके) |
ॲंजेलो मॅथ्यूज ११३ (१२८) जसप्रीत बुमराह ३/३७ (१० षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- दिनेश कार्तिकचा भारतातर्फे १५०वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- जसप्रीत बुमराहचे (भा) १०० एकदिवसीय बळी.
- रोहित शर्माने (भा) एका विश्वचषकात सर्वाधीक शतके ठोकण्याचा विक्रम केला (५).
- लसिथ मलिंगाचा (श्री) विश्वचषकातील शेवटचा सामना.
ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका ३२५/६ (५० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ३१५ (४९.५ षटके) |
फाफ डू प्लेसी १०० (९४) नॅथन ल्यॉन २/५३ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- १९९२ नंतर दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषकात ऑस्ट्रेलिया पराभूत.
- इम्रान ताहिर आणि जीन-पॉल डूमिनी (द.आ.) दोघांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
संदर्भ
- ^ "आयॉन मॉर्गन वॉर्न्स इंग्लंड अगेन्स्ट 'ब्लाईंड बिलीफ' ॲज वर्ल्ड कप बिड बिगिन्स". द गार्डियन. ३० मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयॉन मॉर्गनच्या ७०० एकदिवसीय धावा". LatestLY. ३० मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान वि वेस्ट इंडीज, आयसीसी विश्वचषक: सामना २ आकडेवारी". हिंदुस्थान टाइम्स. ३१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ "शाई होपचा अफलातून १०० वा एकदिवसीय झेल". नाईन न्यूझ. 2019-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-13 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "ख्रिस गेलाचा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षट्कारांचा विक्रम". टाईम्स ऑफ इंडिया.[permanent dead link]
- ^ "वेस्ट इंडीज विरुद्ध विश्वचषक सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी पराभवाची शृंखला". टाईम्स नाऊ न्यूझ. ३१ मे २०१९ रोजी पाहिले.
- ^ भरत सिरवी. "पाकिस्तानचा विश्वचषक स्पर्धेतील सर्वात मोठा पराभव". इएसपीएनक्रिकइन्फो.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३): न्यू झीलंड वि श्रीलंका – आकडेवारी". क्रिकेट ॲडीक्टर. १ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: फर्ग्युसन, हेन्रीच्या मार्यापुढे श्रीलंका १३६ धावांत गारद". क्रिकेट कंट्री. १ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "इम्रान ताहिर रिफ्लेक्ट्स ऑन अमेझिंग जर्नी ॲज ही प्रिपेअर्स फॉर १००थ कॅप". इएसपीएन क्रिकइन्फो. २ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: 'व्हॉट अ लव्हली बॅटिंग टायगर्स', शकिब अल हसन आणि मुश्तफिकुर रहिमच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विक्रमी भागीदारीबद्दल नेटकर्यांची वाहवा". रिपब्लिक वर्ल्ड. २ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विक्रमी भागीदारीमुळे बांगलादेशची सर्वोत्कृष्ट धावसंख्या". राऊटर्स. 2022-06-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ जून २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); More than one of|access-date=
and|ॲक्सेसदिनांक=
specified (सहाय्य) - ^ "शकिबच्या सर्वात जलद ५००० धावा, २५० बळी". द डेली स्टार(बांगलादेश). २ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "जेसन रॉयची ट्रेंट ब्रीज येथील इंग्लंड वि पाकिस्तान विश्वचषक सामन्यामध्ये विशेष पराक्रमाला गवसणी". टाईम्स नाऊ न्यूझ. ३ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ७): अफगाणिस्तान वि श्रीलंका – आकडेवारी". क्रिकेट ॲडीक्टर. ४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "लहिरु थिरिमन्ने विशेष कामगिरी". डीएनए इंडिया न्यूझ. ४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "टीटरींग साऊथ आफ्रिका होप नॉट टू कॅपसाईज". इएसपीएन क्रिकइन्फो. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९, भारत वि दक्षिण आफ्रिका: रोहित शर्माचे २३वे एकदिवसीय शतक, एलिट यादीत समावेश". हिंदूस्तान टाईम्स. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९, भारत वि दक्षिण आफ्रिका: विराट कोहली ऑन व्हर्ज ऑफ जॉइनिंग महेंद्रसिंग धोणी, सौरव गांगुली इन एलिट लिस्ट अहेड ऑफ ओपनर". हिंदूस्तान टाईम्स. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडविरूद्ध टायगर्सच्या खेळापूर्वीची मनोरंजक तथ्ये". द डेली स्टार (बांगलादेश). ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ९): बांगलादेश वि न्यू झीलंड – आकडेवारी". क्रिकेट ॲडीक्टर. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ९): बांगलादेश वि न्यू झीलंड – आकडेवारी". क्रिकट्रॅकर. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: रॉस टेलर, मॅट हेन्रीमुळे न्यू झीलंडचा बांगलादेशवर २ गड्यांनी विजय". इंडिया टुडे. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "टेलरच्या पन्नास धावा, हेन्रीच्या स्फोटक खेळीने न्यू झीलंडचा बांगलादेशवर थरारक विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "ट्रेंट ब्रिज येथे आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडीज त्यांचा ७०० वा एकदिवसीय सामना खेळणार". न्यूझ नेशन. ६ जून २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९: सामना १०, ऑस्ट्रेलिया वि विंडीज, अवलोकन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध कॅरेबियन लढत". क्रिकट्रॅकर. ६ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "ख्रिस गेलला डीआरएसमुळे मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन वेळा जीवदान". न्यूझ नेशन. 2019-06-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: ऑस्ट्रेलियाच्या विजयात स्मिथ, कल्टर-नाईल, चमकले". इंडीया टुडे. ६ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्षणचित्रे, ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ सामना, संपूर्ण क्रिकेट धावफलक: ॲरन फिंचच्या संघाचा १५ धावांनी विजय". फर्स्ट क्रिकेट. ६ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (१२वा सामना): इंग्लंड वि बांगलादेश – आकडेवारी अवलोकन". क्रिकेट ॲडिक्टर. ८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: बांगलादेश विरुद्ध इंग्लंडच्या ३८६ धावांनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस". क्रिकेट ॲडिक्टर. ८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "नीशॅम, फर्ग्युसन पुढे अफगाणिस्तान हतबल". क्रिकेट कंट्री. ८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया लीक रन्स, ॲंड रोहित-धवन टॉपल्स ग्रीनेज-हेन्स". इएसपीएन क्रिकइन्फो. ९ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "इंडिया मेक देअर वर्ल्ड कप स्टेटमेंट". क्रिकबझ. १० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b "धवनच्या ११७ धावा आणि भुवनेश्वरच्या तीन बळींमुळे भारताचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो. १० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९ : 'टीम इंडिया'चा ऑस्ट्रेलियाला दणका; केला कोणालाही न जमलेला विक्रम". लोकसत्ता. १० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "मोहम्मद आमीर विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पाच बळी घेणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज". इंडिया टुडे. १२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची अडखळत सुरवात". डॉन. १२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना १९): इंगलंड वि वेस्ट इंडीज – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. १४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "वूड ॲंड आर्चर स्टील शो ॲज विंडीज फोल्ड अप फॉर २१२". सोशल न्यूझ. १४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि पाकिस्तान: विराट कोहलीच्या सर्वात जलद ११,००० एकदिवसीय धावा". इंडिया टुडे. १६ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक: टॉंटन सामन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडीज वेग घेण्यास उत्सुक". स्पोर्टींग न्यूझ. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: सामना २३, विंडीज वि बांगलादेश – आकडेवारी". क्रिकट्रॅकर. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९ (सामना २३): बांगलादेश वि विंडीज – आकडेवारी". क्रिकेट ॲडीक्टर. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: हेटमायरचे सर्वात जलद अर्धशतक, १००० एकदिवसीय धावा पूर्ण". स्पोर्टस्टार. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "शकिबच्या ६,००० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा पूर्ण". ढाका ट्रिब्यून. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: शकिब अल हसन, लिटन दासमुळे बांगलादेशचा वेस्ट इंडीज विरुद्ध विक्रमी पाठलाग". स्क्रोल इंडीया. १७ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयॉन मॉर्गन आणि इंग्लंड संघाच्या विश्व विक्रमांमुळे अफगाणिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जवळ जवळ संपुष्टात". मेट्रो. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयॉन मॉर्गनच्या १७ षट्कारांसह ७१ चेंडूंत १४८ धावा - नवीन एकदिवसीय विक्रम". स्पोर्टींग लाईफ. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयॉन मॉर्गन: इंग्लंडच्या कर्णधाराकडून अफगाणिस्तान विरुद् १७ षट्कारांचा विक्रम". बीबीसी स्पोर्ट. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या विक्रमी विश्वचषक दिवसाला मॉर्गनच्या १७ षटकारांची झळाळी". याहू न्यूझ. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्पेल इन वर्ल्ड कप: रशीद खान गोज फॉर ११० रन्स ऑफ ९ ओव्हर्स". इंडीया टुडे. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: हाशिम आमलाच्या दुसर्या सर्वात जलद ८,००० एकदिवसीय धावा". स्पोर्ट्स स्टार. १९ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "केन विल्यमसनच्या शतकामुळे न्यू झीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय". टाइम्स ॲंड स्टार. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विल्यमसनमुळे दक्षिण आफ्रिका विश्वचषकामधून बाहेर पडण्याच्या मार्गावर". लूप न्यूझ बार्बाडोस. 2019-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ जून २०१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य); More than one of|access-date=
and|ॲक्सेसदिनांक=
specified (सहाय्य) - ^ "डेव्हिड वॉर्नरच्या विश्वचषक २०१९ मधील सर्वाधिक धावा, विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी". द इंडियन एक्सप्रेस. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b "आकडेवारी - वॉर्नरच्या सहाव्यांदा १५०+ धावा". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "वॉर्नच्या जलद १६६ आणि मुशफिकूरच्या लाढाऊ १०२* धावा". इएसपीएन क्रिकइन्फो. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "मोईन अलीचा १००वा एकदिवसीय सामना". द क्रिकेट खेळाडू. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९ (सामना २७): इंग्लंड वि श्रीलंका – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ a b "आयसीसी विश्वचषक २०१९: सामना २७, इंग्लंड वि श्रीलंका – मलिंगाची जादू, रूटचे सातत्य आणि इतर आकडेवारी". क्रिकट्रॅकर. २२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक स्पर्धेत ५० बळी घेणारा मलिंगा श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज". स्पोर्ट स्टार. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "लसिथ मलिंगाने विश्वचषक स्पर्धेतील ५० बळींचा विक्रम मोडला". इंडियन एक्सप्रेस. २१ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकातील हॅट्ट्रीकमुळे भारत विजयी". द इंडीपेंडट. २२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीच्या हॅट्ट्रीकमुळे भारताचा अफगाणिस्तानवर थरारक विजय". इंडीया. २२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "शमीच्या हॅट्ट्रीकमुळे भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव; कोहलीच्या सामन्यात सर्वाधिक धावा". बीबीसी स्पोर्ट. २२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडने वेस्ट इंडीजला ५ धावांनी हरविले: क्रिकेट विश्वचषक २०१९". द गार्डियन. २२ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३०): पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका - आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. २३ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: पाकिस्तानने ४९ धावांनी विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीतच्या शर्यतीतून बाद केले". इंडिया टुडे. २३ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक: पाकिस्तानच्या आशा जिवंत, लॉर्ड्सवरील वाईट प्रदर्शनानंतर दक्षिण आफ्रिका बाद". क्रिकेट कंट्री. २३ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "हॅरीसच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषकाचे स्वप्न भंगले". इएसपीएन क्रिकइन्फो. २३ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: सामना ३१, बांगलादेश वि अफगाणिस्तान, पुर्वावलोकन – विजयापासून वंचित अफगाणिस्तानचा बांगलादेश विरुद्ध सामना". क्रिकट्रॅकर. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: सामना ३१, बांगलादेश वि अफगाणिस्तान – आकडेवारी". क्रिकट्रॅकर. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश वि अफगाणिस्तान लाईव्ह क्रिकेट स्कोर, सामना ३१". क्रिकेट काऊंट्री. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९, बांगलादेश वि अफगाणिस्तान: शकिब अल हसनचा विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून अद्वितीय इतिहास". हिंदुस्तान टाइम्स. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: शकिब अल हसनच्या अष्टपैलू खेळीमुळे बांगलादेशने लादला अफगाणिस्तानवर सलग ७वा पराभव". इंडिया टुडे. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "शकिब अल हसनचा युवराज सिंगच्या अष्टपैलू विश्वचषक विक्रमाशी बरोबरी". Indian Express. २४ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक स्पर्धेत १००० धावा आणि ३० बळी घेणारा शकिब हा एकमेव खेळाडू".
- ^ "शकिब अल हसनच्या विक्रमामुळे अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेशचा विजय..." रिपब्लिक टीव्ही.[permanent dead link]
- ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवामुळे इंग्लंडच्या विश्वचषक आशा धोक्यात". इव्हिनिंग एक्सप्रेस. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: इंग्लंडला पराभूत करून ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरीत". इंडिया टुडे. =२८ जून २०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "बाबर आझम सर्वात जलद ३,००० धावा पूर्ण करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला". द न्यूझ. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: न्यू झीलंडचा स्पर्धेत पहिल्यांदाच पराभवाचा धक्का दिल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिवंत". इंडिया टुडे. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "अस्वस्थ वेस्ट इंडीज विरुद्ध भारताच्या डळमळीत मधल्या फळीचा निर्धारपूर्वक खेळ". इएसपीएन क्रिकइन्फो. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३४): भारत वि विंडीज – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विराट कोहलीचा सचिन आणि लाराला मागे सारून सर्वात जलद २०,००० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम". टाइम्स ऑफ इंडीया. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक: ऑल्ड ट्रॅफर्डवर भारताकडून वेस्ट इंडीजचा १२५ धावांनी पराभव". बीबीसी स्पोर्ट. २८ जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३६): पाकिस्तान वि अफगाणिस्तान – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३७): न्यू झीलंड वि ऑस्ट्रेलिया – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "ट्रेट बोल्टची विश्वचषक २०१९ स्पर्धेतील दुसरी हॅट्रीक". स्पोर्ट स्टार. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "विश्वचषक २०१९: ट्रेंट बोल्टने रचला इतिहास, विश्वचषक स्पर्धेत हॅट्रीक घेणारा न्यू झीलंडचा पहिला गोलंदाज". हिंदुस्तान टाइम्स. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "व्हाईल यू वेर स्लिपिंग: अग्ली सिन्स मार वर्ल्ड कप क्लॅश". न्यू झीलंड हेराल्ड. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्कमुळे ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंडवर विजय". इएसपीएन क्रिकइन्फो. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३८): इंग्लंड वि भारत – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड, विश्वचषक आमनेसामने: बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडची पुन्हा एकदा कसोटी". इंडीया टुडे. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "भारत वि इंग्लंड धावफलक, क्रिकेट विश्वचषक २०१९: मोहम्मद शमीचे ५ बळी परंतू बेरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडच्या ७ बाद ३३७ धावा". एनडीटीव्ही. ३० जून २०१९ रोजी पाहिले.
- ^ "जॉनी बेरस्टो आणि बेन स्टोक्स मुळे भारताची विजय शृंखला खंडीत". इएसपीएन क्रिकइन्फो. ४ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या विजयाचे बांगलादेश आणि पाकिस्तानवर काय परिणाम". इएसपीएन क्रिकइन्फो. ४ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ३९): श्रीलंका वि विंडीज – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "फर्नांडोच्या पहिल्या एकदिवसीय शतकामुळे श्रीलंकेचे वेस्ट इंडीज समोर कसोटी घेणारे आव्हान". बेलफास्ट टेलिग्राफ. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: सामना ३९, श्रीलंका वि विंडीज – पूरनची अयशस्वी खेळी, होल्डरचे कर्णधार म्हणून १०० बळी आणि इतर आकडेवारी". क्रिकट्रॅकर. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "थरारक सामन्यात श्रीलंकेची वेस्ट इंडीजवर मात". द इंडियन एक्सप्रेस. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ४०): बांगलादेश वि भारत – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्वचषक २०१९ : सामना ४०, बांगलादेश वि भारत – रोहितचे सातत्य, बुमराहची शेवटच्या षटकांतील कामगिरी आणि इतर आकडेवारी". क्रिकट्रॅकर. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ स्पोर्टस्टार, संघ. "एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा आणि १० बळी घेणारा शकिब अल हासन पहिलाच". स्पोर्टस्टार. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट विश्वचषक: बांगलादेशविरुद्ध विजयाने भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित". बीबीसी स्पोर्ट. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी विश्व चषक २०१९: इंग्लंड वि न्यू झीलंड - आकडेवारी". झी न्यूझ. ४ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि न्यू झीलंड: यजमानांचा उपांत्यफेरीत प्रवेश". बीबीसी स्पोर्ट. ४ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "न्यू झीलंडला पराभूत करून इंग्लंड उपांत्य फेरीत". क्रिकबझ. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "जॉनी बेरस्टो, मार्क वूडच्या खेळीमुळे इंग्लंड उपांत्य फेरीत". इएसपीएन क्रिकइन्फो. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ (सामना ४२): अफगाणिस्ताव वि विंडीज – आकडेवारी". क्रिकेट ॲडिक्टर. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्ताव वि वेस्ट इंडीज: गेलचे हेडिंग्लेवर विक्रमाकडे लक्ष". याहू! स्पोर्ट. ५ जुलै २०१९ रोजी पाहिले.