Jump to content

क्रायस्लर

क्रायस्लर
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र प्रवासी मोटार कार
स्थापना जून ६, १९२५
संस्थापक वॉल्टर क्रायस्लर
मुख्यालयऑबर्न हिल्स, मिशिगन, Flag of the United States अमेरिका
कर्मचारी ८०,०००
संकेतस्थळक्रायस्लर समूह एलएलसी http://www.chrysler.com/crossbrand/intl_site_locator/

क्रायस्लर ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या ऑबर्न हिल्स ह्या उपनगरामध्ये आहे. वॉल्टर क्रायस्लर ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९२५ मध्ये क्रायस्लरची स्थापना केली. डॉज, जीप इत्यादी लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन व विक्री क्रायस्लरच्या अधिकारात आहे.

१९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या या कंपनीचे ली आयकोका मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले.

एप्रिल २००९ मध्ये क्रायस्लरने दिवाळखोरीची घोषणा केली.