Jump to content

क्युरिऑसिटी (रोव्हर)

क्युरिऑसिटी
क्युरिऑसिटी अंतराळयान
क्युरिऑसिटी अंतराळयान
मालक देश/कंपनी नासा
निर्मिती संस्था बोईंग
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान अटलास व्ही-५४१
प्रक्षेपक स्थान केप कार्निवल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
प्रक्षेपक देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
प्रक्षेपण दिनांक २६ नोव्हेंबर इ.स. २०११
इंधन सौरउर्जा
निर्मिती माहिती
वजन९०० किलोग्रॅम
आकार २.९मीटर ×२.७ मीटर × २.२ मीटर
वस्तुमान ९०० किलो
कॅमेरा १७ प्रकारचे कॅमेरे
कालावधी २३ महिने
अधिक माहिती
उद्देश्य मंगळावरील हवामान आणि भूगर्भाचा अभ्यास
कार्यकाळ ८ महिने
बाह्य दुवे
संकेतस्थळ

क्युरिऑसिटी हे मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी नासा ने २६ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी सकाळी १०.०२ पाठवलेल्या अंतराळयानाचे नाव आहे.[] यालाच ‘मंगळ विज्ञान प्रयोगशाळा’ किंवा ‘मार्स सायन्स लॅबोरेटरी’ ऊर्फ ‘क्युरिऑसिटी’ असे नाव देण्यात आले.

मंगळावर अवतरण

क्युरिऑसिटी अंतराळयान अटलास व्ही-५४१ च्या सहाय्याने २६ नोव्हेंबर इ.स. २०११ रोजी मंगळावर पाठविण्यात आले. या अंतराळयानाला ६ ऑगस्ट इ.स. २०१२ रोजी मंगळावरील ‘गेल कुंड’ नावाच्या भागात ते यशस्वीपणे उतरविण्यात आले. गेल कुंडाचा आकार एखाद्या टेकडीसारखा आहे. गेल कुंड १५४ किलोमीटर रुंद आहे, तर मध्यभागी ४.८ किलोमीटर उंच आहे. ‘क्युरिऑसिटी’मधील बग्गी येथे ९८ आठवडे कार्यरत राहील आणि मंगळावर जमा केलेली माहिती पाठवित राहील.

बग्गी

‘क्युरिऑसिटी’च्या बग्गीला सहा चाके आहेत. तिच्यावर अनेक वैज्ञानिक उपकरणे आहेत, कॅमेरे आहेत, हवामान तपासणी यंत्रे आहेत. कठीण दगडाचे वेधन करू शकेल असा यांत्रिक हात आहे. खडकापासून दूर राहूनही लेझर किरणाच्या सहाय्याने खडकाचे कपचे काढता येण्याची सोय या बग्गीत आहे. खडकांचे रासायनिक विश्लेषण करून त्यातील कर्ब, नत्र, स्फुरद, गंधक, ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्याची कामगिरी ही बग्गी करू शकेल. या रासायनिक विश्लेषणामुळे मंगळावरील मातीत सूक्ष्मजीव आहेत का किंवा त्यांचे जीवाश्म आढळतात का हे तपासले जाईल. मात्र, मंगळावर सूक्ष्मजीव असतील आणि यदाकदाचित ‘क्युरिऑसिटी’च्या सान्निध्यात आले तर त्यांना ओळखण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याबाबत खात्री करून घेण्यासाठी मंगळावरील दगड- मातीचे नमुने पृथ्वीवर आणून त्या नमुन्यांचे सखोल परीक्षण करावे लागेल. मात्र या मोहिमेत ते शक्य नाही.

क्युरिऑसिटीवरील वैज्ञानिक उपकरणे

संदर्भ

  1. ^ "'क्युरिऑसिटी'चा मंगळावर आघात". 2012-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-21 रोजी पाहिले.