Jump to content

क्नेसेट

क्नेसेटची जेरूसलेममधील इमारत

क्नेसेट (हिब्रू: הַכְּנֶסֶת; अरबी: الكنيست‎) ही पश्चिम आशियामधील इस्रायल देशाची संसद आहे. क्नेसेट हे इस्रायल संसदेचे एकमेव सभागृह असून इस्रायल सरकारच्या विधायक शाखेचे कामकाज येथे चालते. देशासाठी कायदे मंजूर करणे, राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधानाची निवड, मंत्रीमंडळ स्थापना इत्यादी अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी क्नेसेट जबाबदार आहे.

क्नेसेटमध्ये १२० सदस्य असतात जे चार वर्षांच्या कालावधीसाठी निवडून येतात. इस्रायलच्या सर्व नागरिकांना क्नेसेट निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क आहे.

बाह्य दुवे