कौशल इनामदार
कौशल इनामदार | |
---|---|
जन्म | ऑक्टोबर २, इ.स. १९७१ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठा, भारतीय |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन, सुगम संगीत |
संगीत प्रकार | गायन, संगीतकार |
कार्यकाळ | इ.स. १९९६ - चालू |
प्रसिद्ध आल्बम | मराठी अभिमान गीत |
प्रसिद्ध रचना | मराठी अभिमान गीत |
प्रसिद्ध नाटक | आरण्यक |
प्रसिद्ध चित्रपट | बालगंधर्व |
वडील | श्रीकृष्ण नरहर इनामदार |
आई | ललकारी इनामदार |
पत्नी | सुचित्रा इनामदार |
अपत्ये | अनुराग इनामदार |
पुरस्कार | केशवराव भोळे पुरस्कार, इंद्रधनु पुरस्कार, पुलोत्सव पुरस्कार, राजा परांजपे पुरस्कार |
संकेतस्थळ | अधिकॄत संकेतस्थळ |
कौशल इनामदार (ऑक्टोबर २, इ.स. १९७१; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी संगीतकार आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. त्यांनी केलेला मराठी अभिमान गीत नावाचा संगीत दिग्दर्शन केलेला मराठी गाण्यांचा अल्बम विशेष गाजला.
शिक्षण
कौशल इनामदार यांनी शाळकरी वयात असतानाच प्रसिद्ध संगीतकार कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयात झाले. तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील चेतन दातार यांच्याशी त्यांची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात ते नाट्यक्षेत्राकडे वळले. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी फक्त लिखाण करण्यात आणि संगीत अभ्यासण्यात स्वतःला व्यग्र करून घेतले.
कारकीर्द
इनामदार आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस जाहिरातींना आणि अल्बमांना संगीत देण्याचे काम करत असत, त्यांनी इ.स.२०१० साली अनेक नामवंत गायकांना, कलाकारांना व ध्वनि-अभियंत्यांना घेऊन मराठी अभिमान गीत[ हा अल्बम तयार केला. त्या अल्बमामधील गीते महाराष्ट्रात खूप गाजली, व या अल्बमद्वारे त्यांना चांगलीच प्रसिद्धी लाभली. संगीत देण्याबरोबरच त्यांनी स्वतःच या अल्बमची निर्मिती व प्रकाशनव्यवस्था सांभाळली. ’मराठी अभिमान गीता’नंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आले. इ.स. २०११ साली प्रदर्शित झालेल्या बालगंधर्व चित्रपटासाठी त्याचे संगीत दिग्दर्शन होते. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अजिंठा या आगामी चित्रपटासाठीही तो संगीत दिग्दर्शन करणार आहे[ संदर्भ हवा ].
दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमांतही त्यांचा सहभाग राहिला आहे. झी मराठी या दूरचित्रवाहिनीच्या सा रे ग म प या संगीतस्पर्धा कार्यक्रमात त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
चित्रपट
चित्रपटाचे नाव | भाषा | वर्ष (इ.स.) | सहभाग |
---|---|---|---|
अधांतरी (मराठी चित्रपट) | मराठी | इ.स. २००४ | संगीत दिग्दर्शन |
आग (मराठी चित्रपट) | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
इट्स ब्रेकिंग न्यूझ (हिंदी चित्रपट) | मराठी | इ.स. २००७ | संगीत दिग्दर्शन |
कृष्णा काठची मीरा (मराठी चित्रपट) | मराठी | इ. स. २००१ | संगीत दिग्दर्शन |
नॉट ओन्ली मिसेस राऊत | मराठी | इ.स. २००३ | संगीत दिग्दर्शन |
बालगंधर्व | मराठी | इ.स. २०११ | संगीत दिग्दर्शन |
रास्ता रोको(मराठी चित्रपट) | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
हंगामा (मराठी चित्रपट) | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
अजिंठा | मराठी | इ.स. २०१२ | संगीत दिग्दर्शन |
संशयकल्लोळ | मराठी | इ.स. २०१३ | संगीत दिग्दर्शन |
पितृऋण | मराठी | इ.स. २०१३ | संगीत दिग्दर्शन |
यलो | मराठी | इ.स. २०१३ | संगीत दिग्दर्शन |
रंगा पतंगा | मराठी | इ.स.२०१५ | संगीत दिग्दर्शन |
उबुंटु | मराठी | इ.स. २०१८ | संगीत दिग्दर्शन |
फोटो प्रेम | मराठी | इ.स. २०२१ | संगीत दिग्दर्शन |
तीन अडकून सिताराम | मराठी | इ. स. २०२३ | संगीत दिग्दर्शन |
चित्रपटबाह्य अल्बम
चित्रपटाचे नाव | भाषा | वर्ष (इ.स.) | सहभाग |
---|---|---|---|
कामना पूर्ती | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
गीतेचा तो साक्षी वदला | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
चाफ्याचे शिंपण | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
भावांजली | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
मन पाखराचे होई | मराठी | संगीत दिग्दर्शन | |
रात्र भिजली | मराठी | १९९७ | संगीत दिग्दर्शन |
शुभ्र कळ्या मूठभर | मराठी | १९९६ | संगीत दिग्दर्शन |
जान्हवी | मराठी | २००७ | संगीत दिग्दर्शन |
वैयक्तिक
कौशल इनामदार याच्या पत्नीचे नाव सुचित्रा असून त्यांना अनुराग नावाचा मुलगा आहे[ संदर्भ हवा ].
कौशल इनामदार यांना संगीतकार म्हणून मिळालेले पुरस्कार
- स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेचा १९९९ सालचा केशवराव भोळे पुरस्कार
- इंद्रधनु ठाणे या संस्थेचा २००० सालचा युवोन्मेष पुरस्कार
- लोकसत्ता आणि थिएटर अकॅडमीतर्फे दिला जाणारा २००२ सालचा अनंत अमेंबल पुरस्कार ‘इन्व्हेस्टमेन्ट’ या एकांकिकेसाठी
- महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, द्वितीय पारितोषिक २००५ साली, ‘रघुपती राघव राजाराम’ या नाटकासाठी
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कौशल इनामदार चे पान (इंग्लिश मजकूर)
- "अधिकॄत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2018-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-23 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - साचा:कौशल इनामदार यांचा ब्लॉग
- 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर कौशल इनामदार यांनी संगीत दिलेली गाणी