Jump to content

कौरव

भारताच्या प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध कुरू कुलातील व्यक्तींना कौरव असे म्हणले जाते. महर्षी व्यास रचित महाभारत या महाकाव्यामुळे ढोबळमानाने दुर्योधन व त्याच्या बंधूंना कौरव असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. १०० कौरवांची नावे जन्माच्या क्रमाने खालीलप्रमाणे

१. दुर्योधन२. युयुत्स३. दुःशासन४. दुस्सल५. दुश्शल६. जलसंघ७. सम८. सह९. विंद१०. अनुविन्द
११. दुर्धर्ष१२. सुबाहू१३. दुष्प्रधर्षण१४. दुर्मर्षण१५. दुर्मुख१६. दुष्कर्ण१७. सोमकीर्ति१८. विविंशती१९. विकर्ण२०. शल
२१. सत्त्व२२. सुलोचन२३. चित्र२४. उपचित्र२५. चित्राक्ष२६. चारुचित्र२७. दुर्मद२८. दुर्विगाह२९. विवित्सु३०. विकटानन
३१. ऊर्णनाभ३२. सुनाभ३३. नंद३४. उपनंद३५. चित्रबाण३६. चित्रवर्मा३७. सुवर्मा३८. दुर्विरोचन३९. अयोबाहु४०. चित्रांगद
४१. चित्रकुंडल४२. भीमवेग४३. भीमबल४४. बलाकी४५. बलवर्धन४६. उग्रायुध४७. सुषेण४८. कुंडोदर४९. महोदर५०. चित्रायुध
५१. निषंगी५२. पाषी५३. वृंदारक५४. दृढवर्मा५५. दृढक्षत्र५६. सोमकीर्ति५७. अनुदर५८. दृढसंघ५९. जरासंघ६०. सत्यसंघ
६१. सद्सुवाक६२. उग्रश्रवा६३. उग्रसेन६४. सेनानी६५. दुष्पराजय६६. अपराजित६७. पंडितक६८. विशालाक्ष६९. दुराधर७०. आदित्यकेतु
७१. बहाशी७२. नागदत्त७३. अग्रयायी७४. कवची७५. क्रथन७६. दृढहस्त७७. सुहस्त७८. वातवेग७९. सुवची८०. दण्डी
८१. दंडधार८२. धनुर्ग्रह८३. उग्र८४. भीमस्थ८५. वीरबाहु८६. अलोलुप८७. अभय८८. रौद्रकर्मा८९. दृढरथाश्रय९०. अनाधृष्य
९१. कुंडभेदी९२. विरावी९३. प्रमथ९४. प्रमाथी९५. दीर्घरोमा९६. दीर्घबाहु९७. व्यूढोरू९८. कनकध्वज९९. कुंडाशी१००. विरजा
  • ही नावांची यादी महाभारतातच द्रौपदी स्वयंवर, घोषयात्रा व उत्तरगोग्रहण आदी ठिकाणी अलग अलग प्रकारांनी दिली आहे. या विविध याद्यांपैकी एक यादी वर दिली आहे. मूळच्या यादीतील काही नावे पुन्हा पुन्हा आली आहेत, तर काही नावांऐवजी समान अर्थाची वेगळी नावे आहेत.
  • शंभर कौरवांना सर्वात धाकटी एक बहीण होती. तिचे नाव दुःशला तिचा विवाह जयद्रथ ह्याचेशी झाला होता.

पत्नी आणि मुले

दुर्योधनला चार पत्नी होती -

  • मयुरी
  • श्रीमती
  • सुचिता आणि भानुमती

दुःशासनला पाच पत्नी होती ज्यातात चंद्रमुखी, श्वेता, लता, निर्जरा आणि दिविजा होत्या. चंद्रमुखी सोबत त्याला ध्रुमसेन नावाचा मुलगा झाला.दुस्सलला दोन पत्नी होती- सुजाता आणि नीला. सोमकीर्तिला हेमाप्रभा नावाची पत्नी होती. चित्रायुधला पद्मांजलि नावाची पत्नी होती आणि त्यांना दोन मुले होती- दक्षेस आणि मुली शकीला. चारुचित्रला संजुक्ता नावाची पत्नी होती. दीर्घबाहुला आयुष्मती नावाची पत्नी होती. आणि कौरव चा पत्नीचा नाव स्त्री पर्व मध्ये आहे.