कोस्टास कारामानलिस
कोस्टास कारामानलिस (ग्रीक: Κωνσταντίνος (Κώστας) Καραμανλής) (सप्टेंबर १४, १९५६ - हयात) हा ग्रीस देशाचा माजी पंतप्रधान आहे. २००४ व २००७ साली संसदीय निवडणुकी जिंकून तो सलग दोनदा पंतप्रधान झाला. त्याचा काका कोन्स्टांटिनोस कारामानलिस याने स्थापलेल्या नेआ डेमोक्राटिया या उजव्या परंपरावादी पक्षाचा तो माजी अध्यक्षही होता.