Jump to content

कोल्हापुरी फेटा

फेटा हे महाराष्ट्रातील, महाराष्ट्रातल्या पारंपरिक पगडीसाठी मराठी नाव आहे. [१] कोल्हापुरी फेटा हा त्यातीलच एक प्रसिद्ध असा फेटा आहे. हा फेटा विविध आनंदाच्या  कार्यक्रमात ( विवाह सोहळा , उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक कार्यक्रम)  सर्रास वापरला जातो.  कोल्हापुरात  येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत हे कोल्हापुरी फेटा देऊन केले जाते. कोल्हापुरी फेट्याकडे सामाजिक प्रतिष्ठा म्हणून पहिले जाते. कोल्हापुरी फेटा हा विविध  रंगामध्ये उपलब्ध असतो. विशेषतः गुलाबी व भगव्या रंगाचा फेटा वापरण्याकडे लोकांचा कल असतो.