कोर्टनी वॉल्श
कोर्टनी वॉल्श (Courtney Walsh; ३० ऑक्टोबर १९६२, किंग्स्टन, जमैका) हा एक निवृत्त जमैकन क्रिकेट खेळाडू आहे. उजव्या हाताने जलद गोलंदाजी करणारा वॉल्श १९८४ ते २००१ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. १९८४ ते १९९८ दरम्यान वॉल्श ग्लाउस्टरशायर ह्या इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट संघाचा भाग होता.
कोर्टनी वॉल्शने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ५१९ तर २०५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २२७ बळी घेतले. कर्टली ॲम्ब्रोससोबत त्याची आघाडीची गोलंदाज जोडगोळी लोकप्रिय होती. अचूक दृतगती गोलंदाजीसोबत वॉल्श त्याच्या खिलाडूवृत्तीसाठी देखील प्रसिद्ध होता.