कोरोझाल जिल्हा
हा लेख बेलीझचा कोरोझाल जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोरोझाल (निःसंदिग्धीकरण).
कोरोझाल जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोरोझाल टाउन येथे आहे.
आकाराने सगळ्यात छोटा असलेला या जिल्ह्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. लिबेर्ताद येथील साखरकारखाना पूर्वी जिल्ह्यातील सगळ्यात मोठे उद्योगकेन्द्र होता. आता उसाव्यतिरिक्त पपईची लागवड मोठ्या प्रमाणात होते तसेच पर्यटनव्यवसाय सुद्धा विकसित होत आहे.
बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी चार मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत.