कोरेगाव
कोरेगाव | |
जिल्हा | सातारा जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | २३,५३९ (शहर) (२०११) |
दूरध्वनी संकेतांक | ०२१६3 |
टपाल संकेतांक | ४१५-५०१ |
वाहन संकेतांक | MH-११ |
कोरेगाव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचे गाव आहे. नारायण हरी आपटे हे मराठी लेखक येथे रहात होते. त्यांचा मृत्यू कोरेगांव येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९७१ रोजी झाला. कोरेगाव येथे शंकराचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात केदारेश्वरांची यात्रा भरते. तसेच येथे भैरवनाथाचे पण हेमाडपंथी मंदिर आहे. त्यांची पण मोठी यात्रा भरते. या गावातून तीळगंगा ही नदी वाहते, तर वसना ही नदी गावाशेजारून वाहते. ब्रिटिश काळापासून येथे व्यापारी पेठ आहे. इथला व्यापार थेट पंजाब आणि दिल्लीशी पूर्वीपासून आहे. इथला पांढरा आणि काळा घेवडा बेकरी साठी या ठिकाणी पाठवला जातो. आल्याचे मोठे उत्पादन कोरेगाव परिसरात होत असते. अभिनेत्री उषा चव्हाण हिचे एकंबे हे गाव इथून ८ किमी अंतरावर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील हे कोरेगाव तहसील मध्ये मुद्रांक विक्री करीत.
तालुक्यातील गावे
आंबावडे एस कोरेगावआंबावडे एस वाघोलीआंभेरी (कोरेगाव)आंभुळवाडीआनपटवाडीआपशिंगे (कोरेगाव)अरबवाडीआर्वी (कोरेगाव)आसनगाव (कोरेगाव)आसगाव (कोरेगाव)बागेवाडीबानावाडीबेळेवाडीभडाळेभाकरवाडीभक्तवाडीभांडारमाचीभातमवाडीभावेनगरभिमनगरभिवडी (कोरेगाव)भोसे (कोरेगाव)बिचुकलेबोबडेवाडीबोधेवाडीबोरगाव (कोरेगाव)बोरजईवाडीचाडवाडीचंचाळीचौधरवाडीचवणेश्वरचिलेवाडीचिमणगावदहिगाव (कोरेगाव)दरे तर्फे तांबदेऊरधामणेरधुमाळवाडी (कोरेगाव)दुधाणवाडीदुधीदुर्गळवाडीएकांबेएकसळ (कोरेगाव)फडतरवाडी (कोरेगाव)घिगेवाडीगोडसेवाडी (कोरेगाव)गोगावळेवाडी (कोरेगाव)गोळेवाडी (कोरेगाव)गुजरवाडीहासेवाडीहिवरे (कोरेगाव)होळेवाडीजाधववाडी (कोरेगाव)जगतापवाडीजयगाव (कोरेगाव)जळगाव (कोरेगाव)जांब बुद्रुकजांब खुर्दजरेवाडीकाळोशी (कोरेगाव)कान्हेरखेडकरंजखोपकाटेवाडी (कोरेगाव)काथापूरकवडेवाडीखडखडवाडीखामकरवाडीखेड (कोरेगाव)खिरखिंडीकिन्हईकिरोळीकोळावाडीकोंबडवाडी (कोरेगाव)कोरेगावकुमठे (कोरेगाव)ल्हासुर्णेमदनापूरवाडीमंगळापूरमोहितेवाडी (कोरेगाव)मोरेबांडमुगाव (कोरेगाव)नागेवाडी (कोरेगाव)नागझरी (कोरेगाव)नलावडेवाडीनांदवळ (कोरेगाव)नायगाव (कोरेगाव)न्हावी बुद्रुकन्हावी खुर्दनिगडी (कोरेगाव)पळशी (कोरेगाव)पराटवाडीपवारवाडी (कोरेगाव)पिंपोडे बुद्रुक (कोरेगाव)पिंपोडे खुर्दपिंपरी (कोरेगाव)रामोशीवाडी (कोरेगाव)रणदुल्लाबादराऊतवाडी (कोरेगाव)रेवडीरिकीबादरवाडीरूई (कोरेगाव)सायगाव (कोरेगाव)सांगवी (कोरेगाव)साप (कोरेगाव)सर्कलवाडीसासुर्वेसातारा रोडसाठेवाडीशहापूर (कोरेगाव)शेळटीशेंदुर्जणे (कोरेगाव)शिरांबे (कोरेगाव)शिरढोण (कोरेगाव)सिद्धार्थनगरसोळशीसोनकेसुलतानवाडीसुरळी (कोरेगाव)ताडवळे एस कोरेगावताडवळे एस वाघोलीताकाळेतळयेतांबी (कोरेगाव)तांदुळवाडी (कोरेगाव)तारगावत्रिपुटीवडाचीवाडी (कोरेगाव)वेळंग (कोरेगाव)वेळु (कोरेगाव)विखाळे (कोरेगाव)वाघजाईवाडावाघोळी (कोरेगाव)वठार किरोळीवठार स्टेशन