Jump to content

कोरीट

  ?कोरीट

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरनंदुरबार
जिल्हानंदुरबार जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कोरीट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे.

कोरीट हे गाव तापी नदीचा किनाऱ्यावर वसलेले गाव आहे ज्यावेळी प्रकाशा गावात प्राचीन मंदिर म्हणजे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले महादेव मंदिरे उदयास आली तेव्हाच कोरीट गावातील सिद्धेश्वर मंदिर देखील उदयास आली...

नंदुरबार तालुक्यातील व अगदी टोकावर वसलेले गाव पलीकडे शहादा तालुक्यातील हद्द सुरू होते...

गणपती विसर्जनासाठी नंदुरबार तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात गर्दी असते

भौगोलिक स्थान

हवामान

येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.

लोकजीवन

कोरीट गावातील लोक पावसाळ्यात तापी पात्रात मासेमारी करत असतात आणि हिवाळ्यात बरेच कुंटुबांतील लोक रोजगारासाठी गुजरात राज्यात स्थलांतरित होतात.

प्रेक्षणीय स्थळे

सिद्धेश्वर प्राचीन महादेव मंदिर व कोळी बांधवांची खोडाई माता मंदिर प्रसिद्ध आहे..

नागरी सुविधा

नागरी सुविधेचा विचार केला तर शासकीय कामे हे तालुक्यात म्हणजे नंदुरबार येथे करावे लागते...

भाजीमंडी व किराणासाठी दोन किलोमीटरावर वसलेले प्रकाशा गावात जाऊन सुविधा प्राप्त करता येतात...

जवळपासची गावे

सुजालपुर, समशेरपुर आयान शुगर कारखाना असलेले गाव सावळादा ,शिंदे या गावी उमज मातेची मोठी यात्रा डिसेंबर महिन्यात भरते

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate