Jump to content

कोरल टिंबा (पक्षी)

कोरल टिंबा
कोरल टिंबा

कोरल टिंबा (इंग्लिश:curlew-sandpiper; हिंदी:कुररी पनलवा) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी मध्यम आकाराच्या जलरंकाएवढा असून याच्या वरील भागाचा रंग राखी असतो. भुवई पांढरी शुभ्र आणि खालील भाग प्रामुख्याने पांढरा असतो.गळ्याचा खालचा भागआणि छातीचा वरील भाग पिवळट करडा असतो. कित्येकदा छातीचा रंग पिवळसर आणि त्यावर अस्पष्ट गर्द करड्या पट्ट्या असतात. यची चोच काळी असते आणि पाय गर्द राखी रंगाचे असतात.

वितरण

भारताचे समुद्रकिनारे,श्रीलंका,मालदीव,अंदमान आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे.आशियाच्या उत्तर टोकाला वीण.

निवासस्थाने

चिखलानी आणि दलदली.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली