Jump to content

कोरफड

कोरफड
कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते.

कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

कोरफड ही एकाच ॲलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा "खरी कोरफड" होय.मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित "कोरफड व्हेरा" प्रमाण मानली जाते. ॲलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते.

वर्णन

बहुतांश कोर्या प्रजातींमध्ये पान म्हणजे एक मोठा, जाड, मांसल काटेरी दात असलेला दांडा असतो. फुलांचे फुलं ट्यूबल्युटर असतात, बहुतेक पिवळे, नारिंगी, गुलाबी किंवा लाल असतात आणि ते साधे किंवा पुष्कळ फांद्यांचे, हिरव्या नसलेले दातांचे शीर्षस्थानी असतात, घनतेने क्लस्टर्ड आणि लॅंडिंग करतात. कोरफड जातीच्या अनेक प्रजाती दमठल्यासारखे दिसतात, जमीनीच्या पातळीवर थेट उष्माघातामुळे; इतर जातींमध्ये एक पुष्कळ फांदया किंवा खवलेला स्टेम असू शकतो ज्यामधून मांसल पाने स्प्रिंग असतात. ते राखाडी रंग ते तेजस्वी-हिरव्या रंगाच्या असतात आणि काहीवेळा स्ट्रीप किंवा चंचल असतात. दक्षिण आफ्रिकेचे मूळचे काही झाडच वृक्षाप्रमाणे (उष्ण प्रदेशातील) आहेत.

कोरफडीमुळे होणारे फायदे

टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते. जमिनीत लावले असता कमी पाण्यात येते. पाणी नियमित घातल्यास पान दळदार व रसरशीत होते.

कोरफडीस संस्कृतमध्ये कुमारी, इंग्रजीत बार्बेडोस ॲलो [] व शास्त्रीय परिभाषेत ॲलो बार्बेडेन्सिस [] असे म्हणता आणि विदर्भातील झाडीप्रांतात गवारफाटा असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुळातील असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. हिच्या भारतीय जाती Aloe vera (ॲलोव्हेरा) आणि Aloe indica (ॲलोइंडिका) या आहेत.

उपयोग

कोरफडीमध्ये ॲलोईन ( २० ते २२%), बार्बॉलाई (४ ते ५%) तसेच शर्करा, एन्झाईम व इतर औषधी रसायने असतात. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हिच्या पानांत ॲलोईन व बार्बालाईन ही मुख्य ग्लुकोसाइड्‌स असतात.

संदर्भ व नोंदी

  1. ^ बार्बेडोस ॲलो (इंग्लिश: Barabados aloe)
  2. ^ ॲलो बार्बेडेन्सिस (रोमन लिपी: Aloe barbadensis)