कोयना नदी
हा लेख कोयना नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोयना (नि:संदिग्धीकरण).
कोयना नदी | |
---|---|
कोयना नदी | |
इतर नावे | शिवसागर जलाशय |
उगम | महाबळेश्वर, महाराष्ट्र |
मुख | महाबळेश्वर पंचगंगा मंदिर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | १३० किमी (८१ मैल) |
उगम स्थान उंची | १,४३८ मी (४,७१८ फूट) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा नदी |
उपनद्या | सोळशी केरा |
धरणे | कोयना धरण |
कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे. ही कृष्णेची उपनदी आहे. कराड शहराजवळ या दोन्ही नद्यांचा संगम आहे. कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा येथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात सामावते. शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते. पाटण येथे तिला केरा नदी मिळते.
या नदीचं लांबी १३० किलोमीटर इतकी आहे. कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो. या नदीचा उगम महाबळेश्वर डोंगररांगांमध्ये सुमारे चार हजार फूट उंचीवर झाला आहे. कोयना नदी प्रकाशझोतामध्ये आली ती कोयना धरणाच्या बांधकामानंतरच. ही नदी महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून सर्वश्रुत आहे. ही नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. कोयना नदी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाटण या तालुक्यातून मुख्यत्वेकरून वाहते. या नदीला पाच उपनद्या आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
उपनद्या
- सोळशी
- केरा
- कांदाटी
- मोर्ण
- वांग
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत