कोमायागुआ प्रांत
हा लेख होन्डुरासचा प्रांत कोमायागुआ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोमायागुआ (निःसंदिग्धीकरण).
कोमायागुआ प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या पश्चिम मध्य भागात असलेला हा प्रांत दुर्गम आणि डोंगराळ आहे. या प्रांतात सोने, तांबे, चांदी आणि ॲस्बेस्टोसच्या खाणी आहेत.
याची राजधानी कोमायागुआ याच नावाच्या शहरात आहे. २०१५ च्या अंदाजानुसार या प्रांताची लोकसंख्या ५,११,९४३ होती.