महाराष्ट्रातिल रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याच्या पुर्व विभागात सारडे गावात कोमनादेवी (Coordinates: १८°५०'०"उत्तर ७३°०'२७"पूर्व ) ही एक स्थान देवता असुन ती पाषाण रूपात पुजली जाते. हे देऊळ उरण शहरापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे. देवीची कोणतीही मुर्ती नसुन एक लहान पाषाण आहे. हे स्थान सारडे गावात असुन त्याच्या पुर्व दिशेला असलेल्या कोमनादेवी डोंगरावर वसलेले आहे. पिरकोन,पाले गावाच्या दक्षिणेला आहे. येथे पुर्वी दाट झाडी होती १९९० नंतर हळूहळू ती कमि झाली . सारडे गावात ही देवता पुजनीय असुन पिरकोन आणि पंचक्रोशित सुद्धा वंदनीय आहे. सध्या २०१५ मध्ये येथे विद्युतवाहिनीचे खांबांद्वारे येथे वीज आली आहे. बहुतेक सर्व व्यवस्था सारडे गावकीकडे किंवा ग्रामपंचायतिकडे आहे. पावसाळ्यात आठवडा अखेरीस हे स्थान आणि टेकडी पर्यंटक आणि स्थानिक तरुणाईने बहरलेले असते, सुर्यास्ताच्यावेळी येथुन उरण मधिल द्रोणागिरी डोंगराच्या पलीकडे सोनेरी प्रकाशांत दक्षिण मुंबई दिसते ,तसेच पावसाळ्यामध्ये काळ्या मेघांमधुन ही मुंबईचे दर्शन होते,तर सांयकाळी विद्युतप्रकाशात चमचमणारे उरण परिसर दिसतो. पावसाळ्यात येथे तरुणाई आणि किशोरवयीन मुले फुटबॉल खेळण्यात व्यस्त असतात. विशेष असा रस्ता अजुन बनविला नाही आहे,अजुन पायवाटेनेच येथे पोहचता येते. येथे विविध पाषाणांनी ही देवता व्याप्त आहे.ह्या पाषाणांत देखिल देवतांचे अंश आहेत असे मानले जाते
गावातील 'जय मल्हार' या सामाजिक संस्थेद्वारे गावकऱ्यांच्या सहकार्याने स्टिलचे खांब आणि शेड चढवुन या स्थानाची शोभा वाढविली आहे.
घोलाच्या पश्चिमेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे जी पाषाण रूपात येथे निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टांत देऊन सांगितले मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजुन मंदिर बांधले गेले नाही,परंतु सारडे पिरकोन गावातिल भक्तांसाठी तिचे महत्त्व अपरंपार आहे.येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरुर घेतात.हि देवता येथे प्रचंड प्रिय असुन तिच्या रिक्षा चालक गणेश म्हात्रे या भक्तांनी स्वतःच्या वाहनांवर कोमनादेवी प्रसन्न हे तिच्या कृपेचे प्रतिक म्हणुन लिहिले आहे.
'सारडे विकास मंच'या सामाजिक संघटनेमधुन
नागेंद्र म्हात्रे,गोपाळ म्हात्रे आणि मंगेश पाटिल आणि
'एन बॉय्स' या लहान मुलांच्या ग्रुपने येथे स्वच्छता मोहिम राबऊन येथिल परीसर स्वच्छ केला आहे.
'गावातील स्वप्निल पाटिल आणि सुशांत माळी 'यांनी सारडे गावची श्री कोमनादेवी,श्री राधाकृष्ण आणि श्री हनुमान यांना समर्पित ध्वनिमुद्रिका 'नटखट कान्हा' ह्या गावातिल ग्रुप तर्फे बनविली आहे.स्थान :-
कोमनादेवी,समुद्र सपाटी पासून १०० मीटर उंच
|
---|
देव | देव · · मसोबा · · म्हसोबा · · विठोबा · · खंडोबा · · खैसोबा · · भगवान जाहरवीर गोगादेव · · ज्योतिबा · · चेतोबा · · जबडेश्वर · · बिरदेव · · बिरदेव · · बिरोबा · · भानोबा · · मुंजोबा · · म्हातोबा · · रवळनाथ · · रोकडोबा · · वेताळेश्वर · · धुळोबा (धुळदेव, हातकणंगले) · · भोजलींग · · बहिरीबाबा/नाथ (मुलखेड) अधिक | |
---|
देवी | देवी · · मेसाई · · राजराजेश्वरी · · मायराणी · · म्हाळसाई · · बोल्हाई · · अंबाबाई · · काळुबाई · · काळम्मा देवी · · योगेश्वरी · · जोगेश्वरी · · अमरजाई · · आंगलाई देवी · · आसरा · · एकवीरा · · कडजाईमाता · · कनकंबादेवी · · कळमजाई माता · · कडजाईमाता · · कांगोरी देवी · · कानूबाई · · कासारदेवी · · काळकाई · · काळबादेवी · · कृष्णाई · · कृष्णाई · · केजू देवी · · कोमनादेवी · · खराळआई · · गजगौरी · · गढीआई · · गामदेवी · · गावदेवी · · चतुःशृंगी · · पर्वती · · चंपावती · · चिंध्यादेवी · · चैत्रगौरी · · चौंडाई · · जननीदेवी · · जिवंतिका · · जरीमरी · · जाखामाता · · जानाई · · ज्येष्ठागौरी · · तळजाई · · तुकादेवी · · तुकाई देवी · · तुळजाभवानी (तुळजाई) · · तुळसाई · · त्वरितादेवी · · तपोवनदेवी (रोहडा, चिखली तालुका) · · धानम्मा (गुड्डापूर, जत) · · नवलाई · · निनाई (चाफळ) · · पांडजाईदेवी (वाईच्या पांडवगडावर) · · पावणाई (निरुखे गाव-कुडाळ तालुका) · · पौडगादेवी · · प्रभादेवी · · पिंगळादेवी नेरपिंगळाई · · फिरंगाई · · बनशंकरी (महाराष्ट्र व कर्नाटक) · · बहिरीदेवी (गडहिंग्लज-कोल्हापूर जिल्हा) · · बाणाई · · बृहद्गौरी · · बोलाई · · भद्रकाली · · भवानी · · भावकादेवी · · भेकराईमाता (पुण्यातील फुरसुंगीजवळ भेकराईनगर) · · मंगळागौरी · · मंगाई · · मंडलाई · · मनुदेवी · · मरीआई · · मेसाई देवी · · महालक्ष्मी · · मळूदेवी (पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावची आणि अंदर मावळातल्या कशाळ गावची ग्रामदेवता · · मांढरदेवी · · मांढरादेवी · · मावलाया (आसरा) · · मुंबादेवी (मुंबई) · · मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील ख्रिश्चन देवी) · · मोहटादेवी (थेरगाव-पुणे) · · म्हाळसा · · यमाई · · यल्लमा (महाराष्ट्र, कर्नाटक) · · योगेश्वरी · · रत्नेश्वरी · · रंभाई (जेजुरी) · · राणुभवानी देवी · · रासाई देवी · · ललिता · · वनदेवी · · वाळंजाई /वाळुंजाई · · विंध्यवासिनी(चिपळूण, रत्नागिरी जिल्हा) · · शाकंभरी · · शांतदुर्गा · · शांतेश्वरी · · शारदमणीदेवी · · शिवाई · · शीतला · · शेवताई (शेवता गाव) · · सटवाई · · सप्तशृंगी · · सातीआसरा · · सोमजादेवी · · हरतालिका · · हिंगलाची यक्षिणी · · हिंगुळा (चौल-रायगड जिल्हा); अडूळ (रत्नागिरी जिल्हा) · · हिंगुळांबिका · · भिवाया · · मायाक्का · · शिर्काई (रायगड) · · पद्मावती (राजगड) · · मावलाई · · तोरणजाई (तोरणा) · · मेंगाई · · शिवाई · · हस्ताबाई (नारायणगड) · · गारजाई (घनगड) · · कोराई (कोराईगड) · · येलूबाई (कोल्हापूर) · · माईबाई · · सोमजाई अधिक |
---|