कोबाल्ट, २७Coकोबाल्ट |
सामान्य गुणधर्म |
---|
दृश्यरूप | राखाडी-चंदेरी रंगाचे घन |
---|
साधारण अणुभार (Ar, standard) | ५८.९३३१९५ ग्रॅ/मोल |
---|
कोबाल्ट - आवर्तसारणीमधे |
---|
|
अणुक्रमांक (Z) | २७ |
---|
गण | अज्ञात गण |
---|
श्रेणी | संक्रामक (धातू) |
---|
भौतिक गुणधर्म |
---|
स्थिती at STP | घन |
---|
विलयबिंदू | १७६८ °K (१४९५ °C, {{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F) |
---|
घनता (at STP) | ८.९० ग्रॅ/लि |
---|
आण्विक गुणधर्म |
---|
इतर माहिती |
---|
संदर्भ | कोबाल्ट विकिडेटामधे |
कोबाल्ट (इंग्लिश: Cobalt ; मूलद्रव्य चिन्ह: Co ; ) हे अणुक्रमांक २७ असलेले धातुरूप रासायनिक मूलद्रव्य आहे. निसर्गतः हे मूलद्रव्य रासायनिक संयुगाच्या स्वरूपातच आढळते. क्षपणकारक प्रद्रावणाने, अर्थात रिडक्टिव्ह स्मेल्टिंग प्रक्रियेने, राखाडी-चंदेरी रंगाचे कोबाल्ट शुद्ध स्वरूपात निराळे काढता येते. चुंबकीय गुणधर्माचे मिश्रधातू बनवण्यासाठी, तसेच शाई, रंगद्रव्ये, व्हार्निश यांच्या उत्पादनात निळ्या रंगासाठी वापरले जाणारे कोबाल्ट अॅल्युमिनेट (रासायनिक सूत्र: CoAl2O4) बनवण्यासाठी कोबाल्टाचा उपयोग होतो. कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक व झांबिया या देशांमध्ये कोबाल्टचे जगातील सर्वाधिक उत्पादन होते.
बाह्य दुवे