कोडिन्ही
कोडिन्ही हे भारताच्या केरळ राज्यात असणारे मल्लपूरम या जिल्हास्थानाजवळचे एक गाव आहे. येथे एक ग्रामपंचायत आहे. या गावाची विषेशता म्हणजे हे जुळ्यांचे गाव आहे. या गावात सुमारे १००० जुळी मुले आहेत. प्रसारमाध्यमांचे स्थानिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक प्रतिनिधी येथे भेट देतात. त्यामुळे या गावातील लोकं त्रस्त आहेत. त्यामुळे येथे व्हीडियो अथवा फोटो काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे.