Jump to content

कोट्टा सच्चिदानंद मूर्ती


कोट्टा सच्चिदानंद मूर्ती (२५ सप्टेंबर, इ.स. १९२४:संगम जगरला मुडी, गुंटूर जिल्हा, आंध्र प्रदेश - २४ जानेवारी, इ.स. २०११) हे भारतीय तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती, धर्म आणि विशेषतः वेदांतावरील त्यांचे लेखन हे रचनात्मक आणि अत्यंत लक्ष्यवेधी मानले जाते. ते बौद्ध तत्त्वज्ञानाचे विशेष अभ्यासक होते. महायान बौद्ध संप्रदायासाठी विस्तृत लेखन नागर्जुनावरील त्यांचे लेखन गाजले. मूर्ती तत्त्वचिंतक म्हणून मूर्तिभंजक होते. प्रा. सुरेंद्र शिवदास बारलिंगे त्यांचे वर्णन "विसाव्या शतकातील तात्त्विक जगतातील मूर्तींचे स्थान एकमेवाद्वितीय आहे" असे करतात. मूर्ती तत्त्वज्ञानात प्रकारभेद मानीत नाहीत. त्यांच्या मते, "तत्त्वज्ञान भारतीय अथवा पाश्चात्य असे काही नसते, ते केवळ तत्त्वज्ञान असते"

कारकीर्द

आंध्र विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि श्री वेंकटेश्वर विद्यापीठाचे कुलगुरू (१९७५-७८),जर्मनीतील विटेनबर्ग युनिवर्सिटी, बल्गेरियातील सोफिया युनिवर्सिटी, चीनमधील पीपल्स युनिवर्सिटीत अभ्यागत प्राध्यापक.

पुरस्कार

पद्म भूषण (१९८४), पद्मविभूषण (२००१).

सन्मान

  1. सोविएत ॲकेडमी ऑफ सायन्सतर्फे Dr. Phil. पदवीने सन्मान
  2. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष (१९८६-८९)
  3. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, इंडिअन फीलॉसॉफिकल काँग्रेसचे कार्याध्यक्ष (१९८०-९४).
  4. सारनाथ येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायर तिबेटन स्टडीज कार्याध्यक्ष,बनारस हिंदू विद्यापीठांसह इतर चार विद्यापीठांकडून डी.लिट.ने सन्मान.
  5. तत्त्वज्ञानातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या डॉ. बिधानचंद्र रॉय राष्ट्रीय पुरस्काराचे पहिले सन्मानित प्राध्यापक.

ग्रंथ लेखन

  1. Commentary on Geeta( ५०० पाने, लेखन वय : १६ , प्रकाशन काल १९४१.) पहिला ग्रंथ प्रसिद्ध.
  2. Dialectics
  3. Evolution of Philosophy in India.
  4. Hinduism and its Development.
  5. Indian Philosophy since 1498.
  6. Nagarjun(1971), Advaitic Notion(1985).
  7. Vedic Hermeneutics (1993)

इंग्लिशमध्ये २५, तेलगूत ११ आणि हिंदीत एक अशी पुस्तके प्रसिद्ध झाली.

तत्त्ववेत्त्यांशी संवाद

कार्ल जास्पर्स आणि बर्ट्रांड रसल् यांनी मूर्ती यांच्याशी आवर्जून अनेक विषयावर चर्चा केली.

संदर्भ

  • Vohra, Ashok (२०११). "Obituary : KOTTA SATCHIDANANDA MURTY", Journal of ICPR Vol xxviii Number 2, April-June 2011 Ed. Mirnal Miri.