कोचुवेली रेल्वे स्थानक
कोचुवेली കൊച്ചുവേളി തീവണ്ടി നിലയം भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | तिरुवनंतपुरम, केरळ |
गुणक | 8°30′34″N 76°53′50″E / 8.50944°N 76.89722°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ७ मी |
मार्ग | तिरुवनंतपुरम-कोल्लम-एर्नाकुलम मार्ग |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. २००५ |
संकेत | KCVL |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण रेल्वे |
स्थान | |
कोचुवेली हे केरळच्या तिरुवनंतपुरम शहरामधील एक रेल्वे टर्मिनस आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी २००५ साली कोचुवेली स्थानक उघडण्यात आले..[१] हे स्थानक शहराच्या उत्तर भागात स्थित असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वरील बाह्यवळण मार्ग येथून जवळ आहे. येथून कोकण रेल्वेमार्गे मुंबई, दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात.
या स्थानकाला पूर्वी द्वार आणि पश्चिमी द्वार अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. पूर्व बाजूला रेल्वे टर्मिनल आहे जिथून कोचुवेली स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या जातात. सध्या तेथून ११ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तर १ पॅसेंजर गाडी सुटते. कोचुवेली रेल्वे स्थानक प्रवाशांना भारतातील महत्त्वाच्या शहरांशी जोडते. बहुतेक गाड्या ज्या आता त्रिवेंद्रम सेंट्रल स्थानकावरून सुटतात (साबरी एक्सप्रेससह) त्या संपूर्ण काम झाल्यानंतर कोचुवेली स्थानकावरून सुटतील.[२] गर्दीच्या काळात येथून काही विशेष गाड्यासुद्धा सुटतात. येथून नवी दिल्ली, हैदराबाद, बिलासपुर, यशवंतपूर, दादर, नवी तिनसुकिया, संत्रागाची आणि चेन्नई साठी गाड्या सुटतात.[३] पश्चिम बाजूला जुने रेल्वे स्थानक आहे.
सुविधा[४]
- संगणीकृत आरक्षित तिकीट केंद्र
- संगणीकृत अनारक्षित तिकीट केंद्र
- उद्घोषणा केंद्र
- जिने
कोचुवेली रेल्वे स्थानक राष्ट्रीय महामार्ग क्र. ४७ काझ्हाकूतम – कोवलम बाह्यवळणापासून १.२ किमी वर तसेच थांपानूर पासून ८ किमी अंतरावर आहे. केरळ बस मंडळाची एसी बससेवा कोचुवेली रेल्वे स्थानक ते त्रिवेंद्रम शहर अशी चालवली जाते. या बसेस रेल्वे गाड्यांच्या येण्याच्या वेळेनुसार चालविल्या जातात.
भविष्यातील विकास
स्थानकाच्या पूर्वी आणि पश्चिमी बाजूला जोडण्यासाठीचा पूल बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. फलाट क्र. २ आणि ३ अजून पूर्णपणे सुरू झालेले नाहीयेत. स्थानकात सध्या ६ फलाट आहेत ज्यांची संख्या स्थानक पूर्णपणे विकसित झाल्यानंतर १० होईल. तेथील कोच केर सेंटरचे अजून बांधकाम सुरू आहे.[५]
गाड्या
- कोचुवेली−लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
- केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
- कोचुवेली−यशवंतपूर गरीब रथ एक्सप्रेस
- कोचुवेली−अमृतसर जलद एक्सप्रेस
- कोचुवेली−हुबळी जलद एक्सप्रेस
- कोचुवेली−बंगळूर एक्सप्रेस
- कोचुवेली−देहरादून जलद एक्सप्रेस
बाह्य दुवे
- ^ "kerala e-gazette" (PDF).
- ^ "Kochuveli Train Station List".
- ^ "Kochuveli (KCVL) Station time table". 2017-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Facilities At Kochuveli Railway Station".
- ^ "Master plan to develop Kochuveli terminal".