कोंढवे धावडे
?कोंढवे धावडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुणे शहर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | नितीन धावडे,पाटील |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/12 |
कोंढवे धावडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
मुठा नदीच्या काठावर वसलेले कोंढवे धावडे गावामध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर पाहण्यासारखे आहे. मंदिर संपूर्ण besolt rock मध्ये आहे . मंदिराची बांधकाम शैली ही वेगळ्या पद्धतीची आहे. उजव्या बाजूला गाभारा आणि डाव्या बाजूला सभामंडप आहे. सभामंडप मधील खांब हे दगडी आणि विशिष्ट शैलीतील घडवलेले आपणास दिसून येतात. सभामंडप मधून समोर मोठे प्रांगण दिसते . इथेच संपूर्ण ग्रामस्थ दसरा मेळावा साठी गाठीभेटी घेतात. मंदिरासमोरच दोन दीपमाळा आपल्याला पाहायला मिळतात. त्यासमोर एक बगाड आहे. बगाड फिरवण्याचा मान हा धावडे कुटुंबाकडे असतो. गावामध्ये स्मशान भूमी जवळ आणखी एक जुने मंदिर आहे. गावाचे खडकेश्र्वर शिवालय देखील पाहण्यासारखे आहे त्याची देखील वास्तुशैली ही अप्रतिम आहे , तिथे देखील दीपमाळ पहावयास मिळते. अनेक वीरगळ तिथे पाहायला मिळतात. गावामध्ये आणखी एक खाजगी कोंढवेश्वर शिवालय पाहायला मिळते. या शिवालय मंदिराची वास्तुशैली मंदिरावरील कळसामुळे ही पेशवेकालीन कालखंडामधील आढळून येते. मंदिरासमोर एक सुंदर बारव पाहायला मिळते. 12 महिने या बारवेला पाणी आढळून येते. गावाची बरीच जमीन ही Nationl Defence Academy मध्ये समाविष्ट झालेली असल्याने तेथील कुंजाई माता मंदिर पाहता येत नाही. गावाला लागून 1 ते 2 Km अंतरावर असलेले खडकवासला धरण पाहता येते.