कोंग ली
- हे चिनी नाव असून, आडनाव कोंग असे आहे.
कोंग ली (मराठी लेखनभेद: गोंग ली ; सोपी चिनी लिपी: 巩俐 ; पारंपरिक चिनी लिपी: 鞏俐 ; फीनयीन: Gǒng Lì ;) (डिसेंबर ३१, इ.स. १९६५; षन्यांग, ल्याओनिंग, चीन - हयात) ही चिनी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. इ.स. १९८७ साली चिनी दिग्दर्शक चांग यीमौ याच्या होंग काओल्यांग (लाल शोगुन) नावाच्या चित्रपटाद्वारे अभिनयातल्या कारकिर्दीस प्रारंभ करणाऱ्या कोंग लीने चांग यीमौसोबत अनेक यशस्वी चित्रपट दिले. पाश्चात्य जगात चिनी चित्रपटांसाठी दखलपात्र स्थान निर्माण करणाऱ्या कलावंतांमध्ये तिची गणना होते.
इ.स. १९९६ साली तिने सिंगापुरी उद्योजक उई ह्यो स्योंग याच्याशी विवाह केला. इ.स. २००८ साली ती सिंगापुराची नागरिक बनली.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कोंग ली चे पान (इंग्लिश मजकूर)