Jump to content

कॉलोनियल कझिन्स

कॉलोनियल कझिन्स (Colonial Cousins) हे भारतामधील हरिहरन व लेस्ली लुईस ह्या गायकांचे एकत्रित नाव आहे. १९९२ साली हरिहरन व लेस्ली लुईसनी ह्या नावाची निर्मिती केली व पॉप गाणी बनवण्यास सुरुवात केली. १९९६ साली त्यांनी कॉलोनियल कझिन्स ह्याच नावाचा आल्बम प्रदर्शित केला ज्याने भारतामधील विक्रीचे मागील सर्व विक्रम तोडले. भारतीय पॉप संगीतामध्ये हा आल्बम एक मोठा स्तंभ मानला जातो.

बाह्य दुवे