कॉर्नवॉल
कॉर्नवॉल | |
---|---|
इंग्लंडची काउंटी | |
कॉर्नवॉलचा ध्वज | |
कॉर्नवॉलचे इंग्लंडमधील स्थान | |
भूगोल | |
देश | युनायटेड किंग्डम |
दर्जा | औपचारिक काउंटी |
प्रदेश | नैऋत्य इंग्लंड |
क्षेत्रफळ - एकूण | १२ वा क्रमांक ३,५६३ चौ. किमी (१,३७६ चौ. मैल) |
मुख्यालय | ट्रुरो |
आय.एस.ओ. ३१६६-२ | GB-CON |
जनसांख्यिकी | |
लोकसंख्या - एकूण (२०११) - घनता | ४० वा क्रमांक ५,३६,००० १५१ /चौ. किमी (३९० /चौ. मैल) |
वांशिकता | |
राजकारण | |
संसद सदस्य | ६ |
जिल्हे | |
|
कॉर्नवाल (इंग्लिश: Cornwall; कॉर्निश: Kernow) ही इंग्लंडची एक काउंटी आहे. कॉर्नवॉल इंग्लंडच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये वसलेली असून तिच्या उत्तरेला व पश्चिमेला सेल्टिक समुद्र, दक्षिणेला इंग्लिश खाडी तर पूर्वेला डेव्हॉन काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत कॉर्नवॉलचा इंग्लंडमध्ये १२वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३९वा क्रमांक लागतो.
ऐतिहासिक काळापासून कॉर्निश लोकांची कॉर्नवॉलमध्ये वस्ती राहिली आहे. कॉर्निश ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा येथील अल्पसंख्य भाषा आहे. ट्रुरो हे कॉर्नवॉलचे मुख्यालय व एकमेव शहर आहे. आर्थिक दृष्ट्या कॉर्नवॉल हा युनायटेड किंग्डममधील सर्वात गरीब भागांपैकी एक आहे. पर्यटन व तांब्याच्या खाणी हे येथील प्रमुख उद्योग आहेत.