Jump to content

कैवल्यानंद सरस्वती

केवलानंद सरस्वती हे महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे संपूर्ण नाव नारायण सदाशिव मराठे होय.

केवलानंद सरस्वती यांचा जन्म ८ डिसेंबर १८७७ रोजी कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली या गावी झाला. त्यांचे शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले.

वाई (जिल्हा सातारा) येथे केवलानंद सरस्वती यांनी स्वतःची पाठशाळा १९०१ पासून सुरू केली. १९१६ मध्ये त्याच पाठशाळेचे प्राज्ञपाठशाळा असे नामकरण करण्यात आले. १९२० मध्ये प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप देण्यात आले. १९२५ मध्ये धर्मकोशाच्या कार्यास त्यांनी सुरुवात केली. तसेच त्यांनी संस्कृतमध्ये मीमांसाकोश (७ खंड) संपादन केले.

केवलानंद सरस्वती यांनी ब्रह्मचर्यातूनच १९३१ मध्ये संन्यास घेतला. शीलसंपन्नता, अध्यात्मनिष्ठा व त्यागभावना हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष होत. १ मार्च १९५५ रोजी वाई येथे ते निधन पावले. तेथे त्यांचे स्मारकमंदिर उभारलेले आहे.

[]

  1. ^ खंड ४, मराठी विश्वकोश. वाई, जि. सातारा.: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. १९७६.