Jump to content

कैद्यांचा पेच

गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलीस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात. नंतर पोलीस त्यांना वेगवेगळे भेटून त्यांच्यासमोर एकच आणि तोच प्रस्ताव ठेवतात. प्रस्ताव असा असतो-

  • कैदी अ गप्प बसला + कैदी ब गप्प बसला = दोघांना ६ महिन्याची साधी कैद
  • कैदी अ गप्प बसला + कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले = कैदी बची सुटका, अला १० वर्षे कारावास
  • कैदी ब गप्प बसला + कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले = कैदी अची सुटका, बला १० वर्षे कारावास
  • कैदी अ ने, ब बद्दल पुरावे दिले + कैदी ब ने, अ बद्दल पुरावे दिले = दोघांना ५ वर्षांचा कारावास

वर दाखवल्याप्रमाणे पोलीस त्या दोघांनाही तो प्रस्ताव समजावुन सांगतात. दोघांनाही त्यातील फायदे व तोटे स्पष्ट दिसतात. दोघेही गप्प बसले तर दोघांचाही त्यात फायदा असतो. पण एक जण गप्प बसला आणि दुसऱ्याने त्याच्याबद्दल पुरावे दिले तर साहजिकच गप्प बसणाऱ्याची मुक संमती आहे असे मानून त्याला गुन्ह्याची सजा मिळणार हे दोघांनाही समजते.

आणि हाच त्यांचा पेच असतो.

पहिल्या मार्गाचा अवलंब केल्यास (दोघांनीही गप्प बसणे), दुसऱ्याची काहीच शाश्वती नसल्यामुळे सरळसरळ आत्महत्या केल्यासारखेच होईल ह्या भीतीने गप्प आपण बसण्याचा मार्ग स्वीकारणे दोघांनाही योग्य वाटत नाही. त्यांना ही जाणीव असते की, त्यामुळे दोघेही कमीत-कमी शिक्षेच्या प्रस्तावाला मुकणार असतात.

दुसरा मार्ग स्वीकरल्यास, (दोघेही एकमेकांबद्दल काही-बाही पुरावे देतील), दोघांनाही १० वर्षांऐवजी ५ वर्षे कैद होईल. आणि हाच मार्ग ते निवडतात. दुसऱ्याला आपल्या गप्प बसण्यामुळे पूर्ण फायदा होईल व तो सुटेल आणि आपण मात्र १० वर्षे कैदेत खितपत पडून राहू हे शहाणपणाचे त्यांना वाटत नाही. दोघेही गप्प बसतील असा विश्वास त्यांना एकमेकाबद्दल वाटणे शक्य नाही, मग अशा परिस्थितीत ते दोघेही तोंड उघडतात व चक्क दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारतात.

"दुसऱ्याचा फायदा होऊ नये म्हणून आपले नुकसान स्वीकारणे" हाच तो कळीचा मुद्दा, ज्याला कैदयांचा पेच असे म्हणले जाते. मनोभ्यासक ह्या मनोवृत्तीचा बारकाईने अभ्यास करतात व त्याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्यात कसा लागू पडतात ते पाहतात.

सांघिक काम- टिमवर्क- हे जितके सोपे वाटते तितकेच अवघड असलेले एक कौशल्य. एकाच छपराखाली एकाच संघटनेत, कंपनीत, कार्यालयात काम करणाऱ्या संघांमधे अशी रस्सीखेच होणे हे नैसर्गिक आहे; पण ते हिताचे नाही. मानवाच्या ह्या अशा मनोवृत्तीची जाण असणे हे प्रत्येक नेत्याचे कर्तव्य आहे. त्यातून मार्ग कसा काढायचा हा लेखाचा एक स्वतंत्र विषय आहे. नेत्यांना ह्याची ओळख एका खेळाद्वारे करून दिली जाते- "विन ऍज मच ऍज यु कॅन".[]

उदाहरणे

संदर्भ

  1. ^ Google's cache of http://www.maayboli.com/node/12181. It is a snapshot of the page as it appeared on 11 Jan 2010 06:48:23 GMT.