कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय
कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील महाविद्यालय आहे. याची स्थापना ५ सप्टेंबर १९९४ साली करण्यात आली. हे महाविद्यालय दोन भागांमध्ये आहे. एक भाग म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि दुसरा भाग म्हणजे सीनियर कॉलेज. या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, व विज्ञान शाखा उपलब्ध आहेत. हे महाविद्यालय एच.एस.सी.बोर्डाचे परीक्षा केंद्र आहे. येथे ११वी ते पदवी पर्यंत शिक्षण दिले जाते. हे लातूर शहरापासून ७.५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे लातूर, बाभळगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांतून विद्यार्थी शिकायला येतात.
- संदर्भयादी