के२
के२ | |
---|---|
के२ पर्वताचे दक्षिणेकडुन दृष्य | |
के२ | |
२८,२५१ फूट (८,६११ मीटर) | |
२ | |
पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान शिन्जियांग, चीन | |
कराकोरम | |
35°52′57″N 76°30′48″E / 35.88250°N 76.51333°E | |
३१ जुलै १९५४ अकिल कोम्पाग्नोनी लिनो लेसदेल्ली | |
के२ तथा छोगोरी किंवा माउंट गॉडविन ऑस्टेन[१] हा पर्वत जगातील एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम पर्वतरांगेतील या पर्वताची उंची ८,६११ मी (२८,२५१ फूट) इतकी आहे.[२][३] पाकव्याप्त काश्मीरच्या बाल्टीस्तान भागात पाकिस्तान-चीन सरहद्दीवरील हे शिखर काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे.
इटालियन गिऱ्यारोहक १९५४मध्ये आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखालील काराकोरम मोहिमेंतर्गत लिनो लेसेडेली आणि अखिल काँपान्योनी यांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. पर्यंत २०१८ फक्त ३६७ व्यक्तींनी हे शिखर सर केलेले आहे. सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर १०,०००पेक्षा अधिक व्यक्तींनी सर केले आहे. अत्यंत अवघड आणि धोकादायक असे हे शिखर सर करणाऱ्या दर चार गिऱ्यारोहकांमागे एका गिऱ्यारोहकाचा पर्वतावरच मृत्यू होतो.[४][५] तोपर्यंत ८७ व्यक्तींचा या पर्वतावर मृत्यू झाल्याची नोंद आहे.
या पर्वताला असलेल्या सगळ्या धारेवरून याचे शिखर सर झालेले आहे परंतु पूर्वेकडील कड्यावरून आत्तापर्यंत याच्यावर कोणीही सफल चढाई केलेली नाही. ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतांपैकी असा हा एकमेव पर्वत आहे.[६] सहसा या शिखरावर जुलै-ऑगस्टमध्ये चढाई केली जाते. वर्षातील इतर वेळी येथील हवामान अतिथंड आणि धोकादायक असते.[७]
१६ जानेवारी, २०२० रोजी निर्मल पुर्जाच्या नेतृत्वाखाली १० नेपाळी गिऱ्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा हिवाळ्यात सर केले.[८]
चित्रपट
- व्हर्टिकल लिमिट, वर्ष २०००
- के२, वर्ष १९९२
- काराकोरम अँड हिमालया,वर्ष २००७
संदर्भ
- ^ Chhoghori, K2. "K2 Chhoghori The King of Karakoram". Skardu.pk. 23 November 2016 रोजी पाहिले.
- ^ "Text of border agreement between China and Pakistan" (PDF). 2012-02-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-11-19 रोजी पाहिले.
- ^ K2 – Brittanica.com
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;seattletimes
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "AdventureStats – by Explorersweb". www.adventurestats.com. 21 October 2015 रोजी पाहिले.
- ^ "Asia, Pakistan, K2 Attempt". The American Alpine Club. 8 August 2019 रोजी पाहिले.
- ^ Brummit, Chris (16 December 2011). "Russian team to try winter climb of world's 2nd-highest peak". USA Today. Associated Press. 26 September 2015 रोजी पाहिले.
- ^ विल्किन्सन, फ्रेडी. नॅशनल जियोग्राफिक.कॉम https://www.nationalgeographic.com/adventure/2021/01/nims-purja-attempts-to-summit-k2-the-worlds-second-highest-peak/. २०२०-०१-१६ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- How high is K2 really? Archived 2008-10-15 at the Wayback Machine. – Measurements in 1996 gave 8614.27±0.6 m a.m.s.l
- K2climb.net Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
- The Mountain Areas Conservancy Project Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
- The climbing history of K2 from the first attempt in 1902 until the Italian success in 1954.
- China Peak Exploration Team to challenge Mt. Qogir Archived 2007-09-30 at the Wayback Machine.
- Outside Online: The K2 Tragedy Archived 2009-04-16 at the Wayback Machine.
- K2: Daring to Dream Documentary
- Sample of K2 poster product including Routes and NotesPDF (235 KiB) From Everest-K2 Posters
- Northern Pakistan - highly detailed placemarks of towns, villages, peaks, glaciers, rivers and minor tributaries in Google Earth Archived 2012-02-04 at the Wayback Machine.
- K2 on SummitPost.Org
- K2 on Encyclopedia Britannica
- Map of K2
- List of ascents to December 2007 (in pdf format)
- 'The Killing Peak' Men's Journal Nov08 Feature Archived 2008-10-10 at the Wayback Machine.