केशवराव दाते
जन्म | केशव त्र्यंबक दाते सप्टेंबर २८, १८८९ |
---|---|
मृत्यू | सप्टेंबर १३, १९७१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय आणि दिग्दर्शन (नाटक) |
भाषा | मराठी |
वडील | त्र्यंबक |
केशवराव दाते ( रत्नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९ - १३ सप्टेंबर, १९७१) हे मराठी नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. ते स्त्रीभूमिकाही करत.
केशवराव दाते यांनी दिग्दर्शित केलेली नाटके
- अरुणोदय
- आग्ऱ्याहून सुटका
- आंधळ्यांची शाळा
- उसना नवरा
- कारकून
- खडाष्टक
- छापील संसार
- जुगार
- झुंज
- तक्षशिला
- बेबंदशाही
- मायेचा पूत
- लपंडाव
- विवित्रलीला
- शिवसंभव
- सवती मत्सर
केशवराव दाते यांची नाटके (आणि त्यांत त्यांनी भूमिका केलेल्या पात्रांची नावे)
- अरुणोदय (रुद्रराम)
- आंधळ्यांची शाळा (मनोहर)
- उसना नवरा (बाबूराव)
- कांचनगडची मोहना (प्रतापराव)
- कारकून (दिनकरपंत)
- कीचकवध (भीम, रत्नप्रभा)
- खडाष्टक (कवीश्वर)
- झुंझारराव (कमळजा, सारजा)
- तारामंडळ (विक्रमसिंग)
- पुण्यप्रभाव (वृंदावन)
- प्रेमध्वज (सम्राटसिंह)
- प्रेमसंन्यास (जयंत)
- बायकांचे बंड (रूपमाया)
- बेबंदशाही (गणोजी शिर्के)
- भाऊबंदकी ( तुळोजी, राघोबा, रामशास्त्री)
- लपंडाव (विनायक)
- विचित्रलीला (विचित्र)
- शारदा (सुवर्णशास्त्री)
- शिवसंभव (शहाजी)
- सत्त्वपरीक्षा (हरिश्चंद्र)
- सवती मत्सर (राम)
- सवाई माधवराव यांचा मृत्यू (केशवशास्त्री, यशोदा)