Jump to content

केम

केम हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गावं आहे.

धर्मस्थळे

केम येथे विविध जाती,धर्माचे लोकबांधव मोठ्या गुण्यागोविंदाने राहत आहेत.मंदिरे, मस्जीते ने केम फुलुन गेले आहे. केम येथे श्री भगवान शंकर याचा अवतार असलेले श्री उत्तरेश्वर महाराज यांचे मंदिर आहे. श्री उत्तरेश्वर महाराज हे येथील ग्रामदैवत असून दर महाशिवरात्रीला येथे भव्य असा उत्सव साजरा होत असतो.गावातुन भव्य असा छबिना निघतो, त्यावेळेस अलोट गर्दी लोटते. हा छबिना पाहण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर येथून भाविक येत असतात.छबिन्यात दारुची रोषणाई केली जाते.

इतर महत्त्वाची मंदिरे.
  • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर्, व्यापार पेठ.
  • श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, वासकर गल्ली.
  • श्री शंकरेश्वर मंदिर, रोपळे रोड.
  • श्री राम मंदिर, तळेकर गल्ली.
  • जामा मस्जिद, मेन रोड.

लोकसंख्या

केमची लोकसंख्या १८००० च्या आसपास असून तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे.सध्या सरपंच म्हणून श्री अजित तळेकर काम पाहत आहेत.

उद्योग व व्यापार

केम हे फार पूर्वीपासूनचं व्यापार व उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. कुंकू उत्पादनात केम हे सर्वात मोठे गाव आहे.असे म्हणतं की वाहतूक व्यवस्था नव्हती तेव्हा देखील कुंकवाची वाहतूक ही बैलगाडीने केली जात. येथील कुंकवाला देशभरातुन मागणी असते.मुंबई, पुणे, लातूर येथील व्यापारी वर्गाची केमला सतत वर्दळ असते.पूर्वी केमला ८० तेलघाणे होते,असे म्हटंले जाते.यंत्रयुगात ते बंद पडले. पण केमचा कुंकवाचा व्यवसाय अजूनही टिकून आहे.

वाहतूक

केम हे विविध शहरांना रस्ते व लोहमार्गाद्वारे जोडले आहे. टेंभुर्णी, करमाळा, कुर्डूवाडी येथे जाण्यासाठी थेट् वाहतूक व्यवस्था आहे. राज्य महामंडळाची परीवहन सेवा व मध्य रेल्वेची सेवा फार पुर्वीपासून चालू आहे.मुंबई-चेन्नई या प्रमुख लोहमार्गावर केम असल्याने त्याचा व्यापाराला थेट् फायदा होतो. केमवासियांनी हैदराबाद-मुंबई या नवीन गाडीचा केम येथे थांबा केला आहे. हैदराबाद येथुन निघालेलि गाडि सकालि ५.३० वजता केम मधुना मुम्बई कडे जाते तर रात्री ७.४५ वाजता मुंबईहुन माघारी येते ...

बँका

केम येथे बॅॅंक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक आहे.तसेच् खालील इतर महत्त्वाच्या बँका आहेत.

  • करमाळा को-ऑप् बँक लि.करमाळा.
  • जिल्हा सहकारी बँक लि. सोलापूर.