Jump to content

केप स्पादाची लढाई

केप स्पादाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान लढली गेलेली आरमारी लढाई होती. ही लढाई क्रीटच्या वायव्य टोकावरील केप स्पादाजवळ १९ जुलै, इ.स. १९४० रोजी ऑस्ट्रेलियाचे आरमार, रॉयल नेव्ही विरुद्ध इटलीचे आरमार यांच्यात झाली. दोस्त राष्ट्रांच्या एक हलकी क्रुझर आणि ५ विनाशिकांनी इटलीच्या दोन हलक्या क्रुझरांना क्रीटजवळ गाठून एकीस जलसमाधी दिली. यात इटलीचे १२१ खलाशी व अधिकारी मृत्यू पावले तर दोस्तांचा एक खलाशी जखमी झाला.