Jump to content

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ

केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: CPTआप्रविको: FACT) हा दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून २० किमी आग्नेयेस आहे. हा दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या तर आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. केप टाउन-जोहान्सबर्ग हा मार्ग जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. २०११मध्ये ४५ लाख प्रवाशांनी या मार्गावर प्रवास केला होता. केप टाउन पासून दक्षिण आफ्रिकेतील बव्हंश शहरांना तसेच आफ्रिका, आशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

इतिहास

केप टाउन विमानतळ १९५४मध्ये प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावेळी याला तत्कालीन पंतप्रधान डी.एफ. मलानचे नाव देण्यात आले होते. तेव्हा येथून एक थेट लंडन तर दुसरी जोहान्सबर्गमार्गे लंडन अशा दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा होत्या.[] १९९० च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद संपुष्टात आल्यावर या विमानतळाची मालकी सरकारकडून नव्याने उभारलेल्या एरपोर्ट्स कंपनी ऑफ साउथ आफ्रिकाकडे हस्तांतरित झाली[] व विमानतळाचे नाव राजकीयदृष्ट्या तटस्थ असे केप टाउन आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आले.[] या विमानतळावरून २००-४-५मध्ये ६२ लाख, २००७-०८मध्ये ८४ लाख तर २००८-०९मध्ये ७८ लाख प्रवाशांनी ये-जा केली. २०१६मध्ये १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला.

२०१० फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. त्यावेळी १.६ अब्ज रॅंड[] खर्च करून आंतरराष्ट्रीय आणि अंतर्देशीय टर्मिनलांना जोडणारे मध्य टर्मिनल उभारण्यात आले. २०१८ च्या शेवटी येथे दुसरी धावपट्टी बांधणे सुरू होईल.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

मे २०१०मध्ये एर नामबियाचे बोईंग ७३७-५०० केप टाउन विमानतळावर
२०११मध्ये टर्किश एरलाइन्सचे एरबस ए३३०-३०० येथून उड्डाण करताना
२०११मध्ये लुफ्तांसाचे बोईंग ७४७-४००
एमिरेट्सचे बोईंग ७७७-२०० येथे उतरताना
विमानकंपनीगंतव्यस्थान 
एर बोत्स्वानागॅबोरोन (तात्पुरती स्थगित)[]
एर फ्रांसपॅरिस-चार्ल्स दि गॉल (२९ मार्च, २०१८ पर्यंत)[]
एरलिंकजॉर्ज, किंबर्ली, मॉन, नेल्सप्रुइट, पीटरमारित्झबर्ग, प्रिटोरिया (८ मे, २०१८ पर्यंत)[], स्कुकुझा, अपिंग्टन, व्हिक्टोरिया फॉल्स, विंडहोक-होसेआ कुटाको
एर मॉरिशसमॉरिशस
एर नामिबियावाल्विस बे, विंडहोक-होसेआ कुटाको
ऑस्ट्रियन एअरलाइन्समोसमी: व्हियेना (२८ ऑक्टोबर, २०१८ पासून पुन्हा सुरू)[]
ब्रिटिश एरवेझदरबान, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, लंडन-हीथ्रो, पोर्ट एलिझाबेझ
मोसमी: लंडन-गॅटविक
कॅथे पॅसिफिकमोसमी: हाँग काँग (१३ नोव्हेंबर, २०१८ पासून)[]
सेनएरप्लेटेनबर्ग बे, होड्सप्रुइट[१०]
कॉंडोरमोसमी: फ्रांकफुर्ट
एडेलवाइस एरमोसमी: झ्युरिक
एमिरेट्सदुबई-आंतरराष्ट्रीय
इथियोपियन एअरलाइन्सअडिस अबाबा
युरोविंग्जमोसमी: कोलोन-बॉन[११][१२](३० एप्रिल, २०१८ पर्यंत)[१३]
फ्लायसाफेरदरबान, ईस्ट लंडन, जोहान्सबर्ग–लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, पोर्ट एलिझाबेथ
मोसमी: जॉर्ज
जूनपॅरिस-चार्ल्स दि गॉल (१ एप्रिल, २०१८पासून)[१४]
केन्या एरवेझलिविंग्स्टन, नैरोबी-जोमो केन्याटा1, व्हिक्टोरिया फॉल्स
केएलएमॲम्स्टरडॅम
कुलुला.कॉमदरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट
मोसमी: म्युन्शेन
मॅंगोब्लूमफॉंटेन, दरबान, जोहान्सबर्ग-लॅन्सेरिया, जोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो, पोर्ट एलिझाबेथ
कतार एरवेझदोहा
ऱ्वांडाएरकिगाली, हरारे2 (१६ मे, २०१८पासून)[१५]
सिंगापूर एअरलाइन्ससिंगापूर3
साउथ आफ्रिकन एरवेझजोहान्सबर्ग-ओ.आर. टॅंबो
साउथ आफ्रिकन एक्सप्रेसब्लूमफॉंटेन, दरबान, ईस्ट लंडन, होड्सप्रुइट, पोर्ट एलिझाबेथ, सन सिटी, वाल्विस बे
टाग ॲंगोला एअरलाइन्सलुआंडा
थॉमस कूक एअरलाइन्समोसमी: लंडन गॅटविक, मॅंचेस्टर[१६]
टर्किश एअरलाइन्सइस्तंबूल–अतातुर्क
वेस्टएर एव्हियेशनविंडहोक-ईरोस4 (१ एप्रिल, २०१८ पासून)[१७]
नोंदी
  • ^1 व्हिक्टोरिया/लिविंग्स्टन येथे थांबा.
  • ^2 किगालीला ये-जा करणारी सेवा हरारे येथे थांबते. हरारे आणि केप टाउन दरम्यान प्रवाशांची ने-आण करण्यास मुभा आहे.
  • ^3 जोहान्सबर्गमध्ये थांबा परंतु केप टाउन-जोहान्सबर्ग प्रवाशांना चढ-उतर करण्यास मनाई.
  • ^4 : हे विमान पुढे ऑरेन्यामुंड पर्यंत जाते परंतु केप टाउन पासूनचे थेट प्रवासी नेता येत नाहीत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बिकफर्ड-स्मिथ, विव्हियन; E. Van Heyningen; Nigel Worden. Cape Town in the twentieth century: an illustrated social history. Cape Town. pp. १२०. 28 December 2009 रोजी पाहिले.
  2. ^ "ACSA – History". Airports Company South Africa. 20 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 December 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ "Cape Town Airport (CPT) Information – Airports Guide to Cape Town". 28 December 2009 रोजी पाहिले.
  4. ^ निकोल्सन, झारा (8 November 2009). "New terminal hailed as a success". Sunday Argus. IOL. 28 December 2009 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.traveller24.com/News/Flights/update-air-botswana-pulls-cape-town-route-on-the-back-of-cemair-grounding-20180216
  6. ^ http://www.heraldlive.co.za/news/2017/12/02/cape-town-voted-worlds-best-city/
  7. ^ http://www.traveller24.com/News/Flights/airlink-suspends-pretoria-to-cape-town-service-20180306
  8. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/273685/austrian-resumes-cape-town-service-from-oct-2018/
  9. ^ Cathay Pacific to fly non-stop to Cape Town from November
  10. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/272735/cemair-adds-hoedspruit-service-from-august-2017/
  11. ^ https://www.eurowings.com/en/booking/offers/flights-from/ZA/CPT/to/DE/CGN.html
  12. ^ http://www.routesonline.com/news/38/airlineroute/271958/eurowings-plans-cape-town-launch-from-nov-2017/
  13. ^ http://www.aero.de/news-28718/Eurowings-legt-Langstreckenziele-ab-Duesseldorf-fest.html
  14. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/276180/joon-s18-expansion-as-of-12dec17/?highlight=cape%20town
  15. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277172/rwandair-adds-new-african-destinations-in-2q18/
  16. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/270885/thomas-cook-schedules-manchester-cape-town-jan-2018-launch/
  17. ^ https://www.routesonline.com/news/38/airlineroute/277454/westair-aviation-outlines-preliminary-scheduled-service-from-april-2018/