केन्शो
केन्शो (पारंपरिक चिनी: 見性; जपानी: 見性; शब्दशः: "'स्व'भाव पाहणे") ही झेन परंपरेतील जपानी संज्ञा आहे. केनचा अर्थ "पाहणे" असा तर शोचा अर्थ "स्वभाव" किंवा "सार" असा होतो.
केन्शो ही आरंभीची अंतर्दृष्टी किंवा जागृती आहे, पूर्ण बुद्धत्व नाही. आणखी सरावाने ही अंतर्दृष्टी खोलवर नेऊन दैनंदिन आयुष्यात तिची अभिव्यक्ती करण्यास शिकावे लागते.
केन्शो ही संज्ञा बऱ्याचदा सतोरी या संज्ञेच्या अर्थच्छटेसाठीही वापरली जाते.