केट ब्लँचेट
केट ब्लॅंचेट | |
---|---|
जन्म | Catherine Élise Blanchett १४ मे, १९६९ मेलबर्न, ऑस्ट्रेलिया |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रेलिया |
कार्यक्षेत्र | हॉलीवूड अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९९२ - चालू |
केट ब्लॅंचेट (इंग्लिश: Cate Blanchett; १४ मे १९६९) ही एक ऑस्ट्रेलियन सिने अभिनेत्री आहे. १९९२ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी ब्लॅंचेट १९९८ सालच्या शेखर कपूर दिग्दर्शित एलिझाबेथ ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. ह्या चित्रपटासाठी तिला बाफ्टा व गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले. २००४ सालच्या द एव्हियेटर ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. २००१-४ दरम्यान तिने द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ह्या चित्रपट शृंखलेमध्ये गॅलाड्रियेल ह्या पात्राची भूमिका केली होती.
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या ब्ल्यू जॅस्मिन नावाच्या चित्रपटामधील भूमिकेसाठी ब्लॅंचेटला सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
बाह्य दुवे
- माहिती
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील केट ब्लँचेट चे पान (इंग्लिश मजकूर)