Jump to content

केंटीश चिखल्या

केंटीश चिखल्या
केंटीश चिखल्याचे चित्र

केंटीश चिखल्या किंवा श्याव टीटवा (इंग्लिश:kentish plover) हा एक पक्षी आहे.[]

हा पक्षी आकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो. तो रंगाने टीटव्यासारखा असतो, परंतु छातीवर काळी पट्टी नसते. विणीच्या काळात डोक्याचा रंग गाजलेला व पिवळसर असतो.

वितरण

हे पक्षी भारत, श्रीलंका, मालदीव आणि लक्षद्वीप बेटात हिवाळी पाहुणे असतात.

निवासस्थाने

ते समुद्र काठच्या पुलंनी, चिखलानी, नद्या आणि दलदली या ठिकाणी निवास करतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
  1. ^ "केंटीश चिखल्या - eBird India". ebird.org. 2021-07-27 रोजी पाहिले.