के.ना. वाटवे
डाॅ. केशव नारायण वाटवे (जन्म {१९ एप्रिल १८९५; - ९ मे १९८१) हे एक मराठीचे प्राध्यापक आणि लेखक होते. त्यांचे शिक्षण औंध (सातारा) आणि पुणे येथे झाले. ते शरद तळवलकरांचे सासरे लागत.
के.ना. वाटवे हे संस्कृत आणि मराठी साहित्याचे रसिक अभ्यासक होते. संस्कृत व मराठी साहित्याची सूक्ष्म आणि रसिक परीक्षणे करून त्यांनी काही पुस्तके लिहिली.
के.ना. वाटवे यांनी लिहिलेली पुस्तके
- किरार्जुनीयम् कथा
- नलदमयंती काव्य (छंदोबद्ध काव्य)
- पंडिती काव्य
- प्राचीन मराठी पंडिती काव्य
- माझी वाटचाल (आत्मचरित्र)
- रसविमर्श
- (पंच महाकाव्याधिष्ठित) संस्कृत काव्याचे पंचप्राण
- संस्कृत नाट्यसौंदर्य
- संस्कृत साहित्यातील विनोद
के.ना. वाटवे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- डाॅ. के.ना. वाटवे यांच्या 'रसविमर्श' या पुस्तकाला सन १९४२ सालातील उत्कृष्ट पुस्तक म्हणून मुंबई विद्यापीठाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर पारितोषिक मिळाले.
- त्याच पुस्तकाला भोर येथील शंकराजी नारायण पारितोषिक
- त्याच पुस्तकाला डेक्कन सोसायटीची इचलकरंजी पारितोषिक
- के.ना. वाटवे यांचा रसविमर्श हा ग्रंथ मुंबई, पुणे, नागपूर, कर्नाटक, गुजरात येथी विद्यापीठांनी बी,ए.ला व एम.ए.ला लावला.