के.जी. आंबेगावकर
के.जी. आंबेगावकर हे भारतीय रिझर्व बँकेचे पाचवे गव्हर्नर होते. सर बेनेगल रामा राउ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यावर आंबेगावकर यांना भारतीय रिझर्व बँकेचे हंगामी गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले. ते गव्हर्नर पदावर ४५ दिवस होते. आंबेगावकर हे एक सनदी अधिकारी होते. गव्हर्नर पदावर येण्यापूर्वी ते वित्त सचिव आणि डेप्युटी गव्हर्नर या पदांवर कार्यरत होते.
रिझर्व बँकेच्या एकाही नोटवर के.जी. आंबेगावकर यांची स्वाक्षरी नाही मात्र वित्त सचिव म्हणून एक रुपयाच्या नोटांवर त्यांची स्वाक्षरी आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.
मागील: सर बेनेगल रामा राउ | रिझर्व बँकेचे गव्हर्नर जानेवारी १४, १९५७ – फेब्रुवारी २८, १९५७ | पुढील: एच. व्ही. आर. अय्यंगार |