कॅरिडीना मल्टिडेंटाटा
कॅरिडीना मल्टिडेंटाटा | ||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
[[चित्र: | ]] | |||||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||||||
Least Concern | ||||||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||||||
| ||||||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||||||
Caridina multidentata Stimpson, 1860 | ||||||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||||||
|
अॅट्यीडेई (Atyidae) कुळातील कॅरिडीना मल्टिडेंटाटा श्रींपची (कोळंबीची) एक प्रजाती आहे. हे मूळचे जपान आणि तैवानमधील आहेत.[१] या श्रींपची सामान्य नावे यामाटो श्रींप, जपानी श्रींप, अमानो श्रींप आणि अल्गी श्रींप अशी आहेत.[२]
वर्णन
या प्रजातीचे अर्धपारदर्शक शरीर असते. शरीराच्या दोन्ही बाजूला लालसर तपकिरी बिंदूंची तुटक रेषा असते. पाठीवर डोक्यापासून ते शेपटीपर्यंत एक पांढरी पट्टी असते. डोळे काळ्या रंगाचे असतात. यामाटो किंवा अमानो श्रींपच्या (जास्त प्रचलित नाव) नर-मादीमधील फरक सहज लक्षात येतो. मादीच्या शरीरावर असणाऱ्या लालसर तपकिरी तुटक रेषा या छोट्या 'तुटक रेषांप्रमाणे' असतात तर नराच्या लालसर तपकिरी तुटक रेषा यांना आपण 'बिंदू रेषा' असे म्हणू शकतो.
18 अंश सेल्सियस ते 28 अंश सेल्सियस तपमानात कॅरिडीना मल्टिडेंटाटा छान राहतात आणि अधिक सक्रिय असतात परंतु, उच्च तापमानामुळे त्यांचे आयुष्यमान खालावू शकते. या प्रजातीसाठी ६.५ ते ७.५ पर्यंतचा पीएच चांगला ठरतो. सर्व कवचधारी (crustaceans) जीवांप्रमाणेच, हेमोसायनीन रक्तामुळे पाण्यात थोडी जरी तांब्याची (Copper) मात्रा असल्यास ती अत्यंत हानिकारक ठरते.[३]
प्रजनन
गोड्या पाण्याच्या प्रवाहात आणि दलदलीमध्ये कॅरिडीना मल्टिडेंटाटा प्रजनन करतात. श्रींपच्या इतर प्रजातींप्रमाणे या प्रजातीतील माद्याही पाण्यामध्ये संकेती रसायन (Pheromones) सोडून समागमास तयार असण्याचे संकेत दर्शवितात, ज्यामुळे नर आकर्षित होतात. पोटाखालील भागात अंडी उबवल्यानंतर मादी लार्वा सोडते. पाण्याच्या प्रवाहात लार्वा वाहत जाऊन खाडीत आणि समुद्रात पोहोचतात. लार्वापासून पूर्ण श्रींप ही वाढीची प्रक्रिया खाडी आणि समुद्रात घडते. पूर्ण वाढ झाली कि ते पुन्हा गोड्या पाण्यात येण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात. पुढे आयुष्यभर ते गोड्या पाण्यात राहतात.
बंदिवासात
वेगवेगळ्या स्त्रोतांच्या म्हणण्यानुसार, 1980च्या दशकाच्या सुरुवातीस, कॅरिडीना मल्टिडेन्टाटा हा श्रींप शोभिवंत मत्स्यपालन जगाला सर्वप्रथम तकाशी अमानो यांनी परिचय करून दिला. शेवाळ हा प्रमुख आहार असल्यामुळे तसेच शोभिवंत मत्स्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी सदर श्रींप मोठ्या संख्येने ठेवला जातो. कॅरिडीना मल्टिडेन्टाटा (Caridina multidentata) हा श्रींप पूर्वी कॅरिडीना जापोनिका (Caridina japonica) नावाने शोभिवंत मत्स्यपालनात प्रचलित होता पण २००६ साली अभ्यासानुसार कॅरिडीना मल्टिडेन्टाटा (Caridina multidentata) असे नाव ठेवण्यात आले.[४]
संदर्भ
- ^ De Grave, S., Shy, J. & Cai, X. 2013. Caridina multidentata. The IUCN Red List of Threatened Species 2013. Downloaded on 14 June 2016.
- ^ Fransen, C. (2015). Caridina multidentata Stimpson, 1860. Accessed through World Register of Marine Species (WoRMS) on 14 June 2016.
- ^ Practical Fishkeeping Magazine (इंग्रजी भाषेत). Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Yixiong Cai; Peter K. L. Ng; Shigemitsu Shokita; Kiyoshi Satake (2006). "On the species of Japanese atyid shrimps (Decapoda: Caridea) described by William Stimpson (1860)" (PDF). Journal of Crustacean Biology. 26 (3): 392–419. doi:10.1651/c-2572.1. JSTOR 4094124.