कॅम्पा कोला हा भारतातीलशीतपेय ब्रँड आहे. १९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव सरकारच्या उदारीकरण धोरणानंतर पेप्सी आणि कोका-कोला या विदेशी कंपन्यांच्या आगमनापर्यंत भारतातील बहुतेक प्रदेशांमध्ये १९७० आणि १९८० च्या दशकात हे भारतीय शीतपेय बाजारात आघाडीवर होते.[२]
वर्तमान संचालन
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (RRVL) ची जलद गतीने चालणारी ग्राहकोपयोगी वस्तू आणि उपकंपनी, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (RCPL), ९ मार्च २०२३ रोजी कॅम्पा या आयकॉनिक ब्रँडच्या पुन्हा लाँचची घोषणा केली.
कॅम्पा पोर्टफोलिओमध्ये सुरुवातीला कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंजचा स्पार्कलिंग पेय श्रेणीमध्ये समावेश असेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने सुरतस्थित हजूरी येथून सॉफ्ट ड्रिंक ब्रँड सोसियोदेखील विकत घेतले आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमीटेड (RCPL) ने गुजरात-मुख्यालय असलेल्या सोसियो हजूरी बेव्हरेजेस प्रा. लि. (SHBPL) मध्ये ५० टक्के भागभांडवल घेणार असल्याची घोषणा केली. कंपनी 'सोसियो' या फ्लॅगशिप ब्रँड अंतर्गत पेयांचा व्यवसाय करते आणि चालवते. SHBPL मधील उर्वरित मालकी विद्यमान प्रवर्तक, हजूरी कुटुंब, यांचीच राहिल.
चित्रदालन
कॅम्पा कोला उत्पादनाची जाहिरात, कॅम्पा ऑरेंज. स्रोत फँटम: द स्वॅम्प ड्रॅगनची मे १९७९ची भारतीय इंद्रजाल कॉमिक्स आवृत्ती आहे.
२०२३ मध्ये कॅम्पा कोला, रिलायन्स मार्ट, इसकॉन मेगा मॉल, अहमदाबाद