कॅनरी पक्षी
कॅनरी पक्षी (शास्त्रीय नाव:सेरिनस कॅनॅरिया) हे एक छोटा पक्षी आहे. रानटी कॅनरीचे मूलस्थान आफ्रिकेच्या अटलांटिक किनाऱ्याजवळील अझोर्स, मदैरा व कॅनरी बेटे असून तो तेथे मुबलक आढळतो. फ्रिंजिलिडी पक्षिकुळातला हा एक गाणारा पक्षी आहे. या माणसाळलेल्या व पाळीव पक्ष्याच्या काही प्रमुख जाती व कित्येक संकरज जाती आहेत.
शरीर रचना
- रंग पिवळसर असून त्यात करडी छटा असते.
- मादीचा रंग हिरवट असतो.
- कपाळ व शरीराची खालची बाजू पिवळी असते.
- काही पाळीव कॅनरी पिवळ्या जर्द रंगाचे असतात.