कॅथे पॅसिफिक
| ||||
| स्थापना | इ.स. १९४६ | |||
|---|---|---|---|---|
| हब | हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
| मुख्य शहरे | बँकॉक तैपै | |||
| फ्रिक्वेंट फ्लायर | एशिया माईल्स | |||
| अलायन्स | वनवर्ल्ड | |||
| उपकंपन्या | ड्रॅगनएर | |||
| विमान संख्या | १४० | |||
| मुख्यालय | फ्युमिचिनो, लात्सियो | |||
| संकेतस्थळ | http://www.cathaypacific.com/ | |||

कॅथे पॅसिफिक (चिनी: 國泰航空) ही हॉंगकॉंगची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख हब असलेली कॅथे पॅसिफिक ५२ देशांमधील २०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते. इ.स. २०१६ साली कॅथे पॅसिफिक प्रवासी सेवा पुरवणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची तर मालवाहतूक करणारी जगातील पहिल्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. कॅथे पॅसिफिकने इतर विमान कंपन्यांशी कोडशेअर करार आणि एकत्रित सेवा करार (Joint Venture) केलेले आहेत. कॅथेची स्व मालकीची ड्रॅगनएर ही साहाय्यक एर लाइन त्यांच्या हॉंगकॉंग येथील मुख्य केंद्रातून एशिया पॅसिफिक प्रदेशात ४४ ठिकाणी सेवा देते. सन २०१० मध्ये कॅथे पॅसिफिक आणि ड्रॅगनएर यांनी जवळजवळ २७० लाख प्रवाशी आणि १८ लाख टनापेक्षा जास्त मालाची व टपालाची वाहतूक केली.
इतिहास
ऑस्ट्रेलियाचे सिडनी एच.डी. कांट झाऊ आणि अमेरिकेचे रॉय सी. फरेल यांनी प्रत्येकी HK$1 गुंतवून दिनांक २४/९/१९४६ रोजी या एर लाइनची नोंदणी केली.[१] उत्तर गोलार्धात जुलै १९९८ मध्ये या विमान कंपनीने जगातील पहिले विना थांबा उड्डाण केले. आणि हे विमान हॉंगकॉंग या नवीन विमान तळावर पोहचणारे पहिले विमान ठरले. या एर लाइनने सन २००६ साली तिची ६० वी जयंती साजरी केली आणि सन २००९ मध्ये स्वीरे पॅसिफिक आणि एर चायना हे तिचे प्रमुख भागधारक झाले .एर चायना ही त्याच्यातील प्रमुख भागधारक आहे. आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने केलेल्या व्यावसायिक गुणात्मक अहवालानुसार सध्या कॅथे पॅसिफिक ही जागतिक पातळीवर ३ क्रमांकाची एर लाइन आहे.[२] कॅथे पॅसिफिक ही माल वाहतूकीचे बाबतीत जगातील सर्वात मोठी विमान सेवा आहे त्याच बरोबर माल वाहतूकीचे बाबतीत या विमान सेवेचे मुख्य केंद्र असलेले हाँग काँग विमान तळ हे जगात सर्वात ज्यास्त गजबजलेले केंद्र आहे.
इतर कंपन्यांच्या फ्लाईट्सशी जोडाजोडी
ऑन लाइन बुकिंग करून जगातील ११० देशांतील प्रवासी या विमान सेवेचा फायदा घेऊ शकतात. मुख्यतः आशिया खंडात या विमान सेवा ४० प्रमुख शहरांसाठी उपलब्ध आहेत. तसेच चीनमधील १७ ठिकाणी ही विमान सेवा आहे. या विमान सेवेत अत्याधुनिक १३० विमाने आकाशात भरारी घेण्यासाठी तयार आहेत.त्यांत एर बस ए३३०-३००, एर बस ए३४०-३००, बोईंग-७७७-३००एआर, बोईंग-७७७-२००, बोईंग ७४७-४००, यांचा समावेश आहे. जॉन स्लोसार हे सध्या(२०१६ साली)कॅथे पॅसेफिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये या एर लाइनने व्यवसायाचे क्षेत्र वाढविले आणि मॅंचेस्टर, झूरिच आणि बोस्टन येथे विमानसेवा सुरू केली.
सेवा आणि सामान सवलत
विमानात चार प्रवासी वर्ग आहेत.
प्रथम वर्ग
या वर्गात फारच उत्कृष्ट व्यवस्था आहे.[३] यात आरामात टेकून बसण्यासाठी शोभिवंत आसने तसेच एकांत आहे. त्यात खान पानाची मनोरंजनाची सोय प्रवाशाच्या इछेप्रमाणे मिळते. या वर्गात मर्यादेबाहेर सामान घेण्याचीही सवलत आहे.. प्रसंगी येथील आसनांचे लाय-फ्लॅट बेड मध्येही रूपांतर करता येते.
व्यवसाय वर्ग
या वर्गातील आसने विविध प्रकारे सजविलेली आहेत. व्यावसायिक प्रवाश्यासाठी हा वर्ग आदर्श आहे. प्रवाश्यांना त्यांच्या मनोरंजनासाठी अगदी प्लग पॉइंट ते डिव्हाईस पर्यन्त सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक सुविधा आहेत. प्रवाशी आरामात, आस्तेवाईकपने दिलेल्या खान पान व्यवस्थेचा समाधानकारक लाभ घेत प्रवास करू शकतात.
प्रीमियम इकॉनॉमी वर्ग
या वर्गात आरामशीर आसन व्यवस्था, चविष्ट अल्पोपअहार, जेवण, मनोरंजन आणि खूप कांही आहे.
इकॉनॉमी (किफायतदायक) वर्ग
हा वर्ग प्रवास खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर असूनही येथील आसने ऐसपैस व समाधान देणारी आहेत तसेच सामानासाठी आवश्यक तेवढी जागा आहे. प्रत्येकाला दूरचित्रवाणीचे कार्यक्रम पाहता येतात. त्यावर तुम्ही चित्रपट पाहू शकता तसेच गाणी ऐकू शकता.
विमान कंपन्यांशी कायदेशीर करार
कॅथे पॅसिफिकने खालील विमान कंपन्यांशी व्यावसायिक कायदेशीर करार केलेले आहेत.[४]
- एर चायना,
- एर न्यू झीलंड,
- एर सिचिलिस,
- अलास्का एर लाइन्स,
- अमेरिकन एर लाइन्स,
- बँकॉक एरवेझ,
- ब्रिटिश एरवेझ,
- कॉम एर,
- ड्रॅगन एर,
- फिजी एरवेझ,
- फिंनएर,
- फ्लाय बे,
- जपान एर लाइन्स,
- लॅन एरलाइन्स,
- मलेसिया एर लाइन्स,
- फिलिपीन एर लाइन,
- कतार एरवेझ,
- एस७ एर लाइन्स,
- व्हिएतनाम एरलाइन्स,
- वेस्टजेट
या एर लाइनचा फ्रेंच हाय स्पीड ट्रेन बरोबरही कोड शेअर करार अाहे. करारप्रमाणे TGV स्टेशन पासून पॅरिसमधील चार्लस द गॉल एर फोर्टपर्यंत आणि तेथून टेन फ्रेंच सिटीपर्यंत कॅथेची सेवा घेता येते.
अवॉर्ड (बक्षिस)
या एर लाइन्सला खालील बक्षिशे मिळाली आहेत.
| सन | बक्षीस |
|---|---|
| २००३ | एर लाइन ऑफ दी इयर |
| २००५ | एर लाइन ऑफ दी इयर |
| २००५ | बेस्ट बिझिनेस क्लास लाऊंज |
| २००५ | जागतिक बेस्ट प्रथम वर्ग |
| २००५ | बेस्ट प्रथम वर्ग लाऊंज |
| २००७ - आत्ता (२०१६ पर्यंत) | जगातील फाईव्ह स्टार एर लाइन |
| २००८ | जगातील बेस्ट प्रथम वर्ग |
| २००८ | बेस्ट प्रथम वर्ग खाद्यसेवा |
| २००९ | एर लाइन ऑफ दी इअर |
| २००९ | बेस्ट एर लाइन एशिया |
| २००९ | बेस्ट एर लाइन साऊथईस्ट एशिया |
| २०१० | बेस्ट एर लाइन ट्रान्सपॅसिफिक |
| २०११ | बेस्ट एर लाइन ट्रान्सपॅसिफिक |
| २०११ | बेस्ट प्रथम वर्ग आसन |
| २०१२ | जागतिक बेस्ट व्यवसाय वर्ग |
| २०१३ | जगातील बेस्ट केबिन स्टाफ |
| २०१३ | बेस्ट एर लाइन ट्रान्स पॅसिफिक |
| २०१४ | एर लाइन ऑफ दी इअर[५] |
| २०१५ | बेस्ट एर लाइन एशिया |
| २०१५ | बेस्ट एर लाइन ट्रान्स पॅसिफिक |
कॅथे पॅसिफिकच्या प्रवासी फ्लाइट्स
- न्यू दिल्ली - हाँग काँग फ्लाइट्स
- मुंबई - हाँग काँग फ्लाइट्स
- बंगलोर - हाँग काँग फ्लाइट्स
- चेन्नई - हाँग काँग फ्लाइट्स
- कलकत्ता - हाँग काँग फ्लाइट्स
- हैद्राबाद - हाँग काँग फ्लाइट्स
- हाँग काँग - ताईपेई फ्लाइट
- हाँग काँग - शांघाय फ्लाइट्स
- यू यॉर्क - हाँग काँग फ्लाइट्स
- लॉस एन्जल्स - सांटियागो फ्लाइट्स
- लिमा - सांटियागो फ्लाइट्स
- हाँग काँग - तोक्यो फ्लाइट्स
- हाँग काँग - सिंगापूर फ्लाइट्स
- टोरांटो - व्हॅंकूव्हर फ्लाइट्स
- स्टॉकहोम - लंडन फ्लाइट्स
देश व शहरे
| देश | शहर |
|---|---|
| ऑस्ट्रेलिया | ॲडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न, केर्न्स, पर्थ, सिडनी |
| ऑस्ट्रिया | व्हियेना |
| बहरैन | बहरैन |
| बांग्लादेश | ढाका |
| कॅनडा | टोरॉंटो, व्हॅंकूव्हर |
| चीन | बीजिंग, छंतू, चोंगछिंग, शांघाय, चंचौ |
| फ्रान्स | पॅरिस |
| जर्मनी | फ्रांकफुर्ट |
| ग्रीस | अथेन्स |
| हाँग काँग | हाँग काँग |
| भारत | मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद |
| इंडोनेशिया | जाकार्ता, देनपसार, सुरबया |
| इटली | मिलान, रोम |
| जपान | फुकुओका, नागोया, ओसाका, सप्पोरो, तोक्यो |
| मलेशिया | क्वालालंपूर, पेनांग |
| मालदीव | माले |
| मेक्सिको | ग्वादालाहारा, मेक्सिको सिटी |
| नेदरलँड्स | अॅम्स्टरडॅम |
| न्यू झीलंड | ऑकलंड |
| फिलिपिन्स | मनिला |
| कतार | दोहा |
| रशिया | मॉस्को |
| सौदी अरेबिया | रियाध |
| सिंगापूर | सिंगापूर |
| दक्षिण आफ्रिका | जोहान्सबर्ग |
| दक्षिण कोरिया | सोल |
| श्री लंका | कोलंबो |
| स्वित्झर्लंड | झ्युरिक |
| तैवान | तैपै |
| थायलंड | बँकॉक |
| संयुक्त अरब अमिराती | दुबई |
| युनायटेड किंग्डम | लंडन, मॅंचेस्टर |
| अमेरिका | ॲंकरेज, अटलांटा, शिकागो, कोलंबस, डॅलस, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, मायामी, न्यू यॉर्क शहर, न्यूअर्क, सॅन फ्रान्सिस्को |
| व्हियेतनाम | हो चि मिन्ह सिटी, हनोई |
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "कॅथे पॅसिफिक -इतिहास".
- ^ "कॅथे पॅसिफिक विमानवाहक सेवा". 2015-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-26 रोजी पाहिले.
- ^ "कॅथे पॅसिफिक -प्रथम श्रेणी प्रवास".
- ^ "कॅथे पॅसिफिक -युती आणि भागीदारी".
- ^ "जगातील सर्वोत्तम विमान कंपनी पुरस्कार - स्कायत्रक्ष २०१४".