कृष्णराव गुलाबराव देशमुख
काशीराव गोविंदराव देशमुख याच्याशी गल्लत करू नका.
कृष्णराव गुलाबराव देशमुख (८ मार्च,१९२२ - २४ ऑक्टोबर, १९९२) हे काँग्रेस पक्षातून निवडून गेलेले भारताच्या १ल्या, २ऱ्या, ४थ्या आणि ५व्या लोकसभेचे सदस्य होते. अमरावतीचे रहिवासी असलेले के.जी. देशमुख व्यवसायाने वकील होते.
त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूरमधील हिस्लॉप कॉलेजातून झाले होते आणि नागपूरच्याच विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली
त्यांच्या पत्नीचे नाव आशादेवी. त्यांना दोन मुले आणि एक कन्या आहे. हे सर्वजण अमरावतीत राहतात.